आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हेच खरे यशाचे फलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:54 PM2018-06-13T23:54:22+5:302018-06-13T23:54:22+5:30
आई-वडिलांच्या आज्ञनेचे पालन करुन यशस्वी होणे हे खरे यशवंत होणे आहे. या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने आईला जाते कारण ती मुलांच्या पालन पोषणासह कुटुंब सुध्दा सांभाळत असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आई-वडिलांच्या आज्ञनेचे पालन करुन यशस्वी होणे हे खरे यशवंत होणे आहे. या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने आईला जाते कारण ती मुलांच्या पालन पोषणासह कुटुंब सुध्दा सांभाळत असते. म्हणून प्रथम गुरुचा मान आईलाच असल्याचे प्रतिपादन उपमुख्याध्यापिका अश्विनी जोशी यांनी व्यक्त केले.
आमगाव प्रेस क्लबतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार शिशुपाल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस. घंटे, पोलीस पाटील नर्मदा चुटे, सेवानिवृत्त शिक्षक शिवचरण शिंगाडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष भोला गुप्ता, उपाध्यक्ष राजीव फुंडे, सचिव राधाकिसन चुटे, प्राचार्य व्ही. डी. मेश्राम उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांनी ज्ञानरुपी अहंकार बाळगू नये, सदैव नम्र असावे तरच येणाºया अडचणीना तोंड देऊन ध्येय गाठता येत असल्याचे मत शिशुपाल पवार यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सातत्याने मेहनत, जिद्द, चिकाटी आणि उद्दीष्ट ठेवून १० वी १२ वीच्या परीक्षेत यश संपादन केले. या मुलींनी आपल्या आई-वडीलांचे व शाळेचे नावलौकीक केल्याचे प्रतिपादन बी. एस.घंटे यांनी यांनी केले.
या वेळी इयत्ता बारावीत उर्तीण झालेली गौरी पवन कटरे (९६ टक्के), रोशनी राजकुमार अग्रवाल (९४ टक्के), ईशा मनोहर मेश्राम (९३.२३ टक्के) तर दहावीच्या परीक्षेत व्टिंकल दयाराम बागडे (९७ टक्के), इमांशी होमेंद्र पटले (९६.६० टक्के), आकांक्षा ब्रम्हानंद वाघमारे (९५ टक्के) आदी गुणवंत विद्यार्थिनीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी विद्यार्थिनीचे पालक सुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व्ही.डी. मेश्राम यांनी तर आभार राजीव फुंडे यांनी मानले.
यशस्वितेसाठी प्रेस क्लबचे मुरलीधर करंडे, नरेंद्र कावळे, गज्जू चुºहे, दिनेश शेंडे, रेखलाल टेंभरे, दिनेश मेश्राम, संजय दोनोडे, अशोक शेंडे, दिनेश जांभुळकर, महादेव शिवणकर, दिलीप फुंडे, दिनू थेर व प्रेस क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.