‘बुद्ध आले दारी’ ऑनलाइन स्पर्धांचे निकाल घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:37+5:302021-05-31T04:21:37+5:30
गोंदिया : संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार महोत्सव समिती, समता सैनिक दल व महिला सशक्तीकरण संघ यांच्या संयुक्त वतीने ...
गोंदिया : संविधान मैत्री संघ, सर्वसमाज विचार महोत्सव समिती, समता सैनिक दल व महिला सशक्तीकरण संघ यांच्या संयुक्त वतीने बुद्ध जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या ‘बुद्ध आले दारी’ जागृतीपर ऑनलाइन कार्यक्रमांतर्गत विविध कला, साहित्य व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले आहेत.
ऑनलाइन स्पर्धांतर्गत गौतम बुद्धांचे मानवतावादी विचार यातील सिनिअर ग्रुपमध्ये डॉ. सुकेशिनी बोरकर (ब्रह्मपुरी), धनराज दुर्योधन (राजुरा), प्रीती कांबळे (गोंदिया) यांनी तर ज्युनिअर ग्रुपमध्ये अर्णव मेश्राम (गोंदिया), सोनाली बावने (गोंदिया), दीक्षा शहरे (तुमखेडा-खुर्द); बौद्ध गीत गायन व काव्य वाचन स्पर्धा सिनिअर ग्रुपमध्ये (काव्य वाचन) मुन्नाभाई नंदागवली (बाराभाटी), किरण वासनिक (गोंदिया), राहुल गायकवाड (हिंगोली); सिनिअर ग्रुपमध्ये (गीतगायन) तामार डोंगरवार (कटंगी), ऋतुजा मनवर (आर्वी), पूजा कांबळे (अहमदाबाद); ज्युनिअर ग्रुपमध्ये स्नेहा मेश्राम (ढाकणी), मोनाली सरदारे (करंजा), रूपम मेश्राम (ढाकणी); क्राँफ्ट मेकिंग आणि बुद्धा ड्रॉइंग-पेंटिंग सिनिअर ग्रुपमध्ये मनोज गजभिये (मुरपार), सुधा चव्हाण (पुरगाव), सुमित रामटेके (कटंगी); ज्युनिअर ग्रुपमध्ये लता पारधी (खमारी), दीप्ती डोंगरे (अदासी), श्रेया देशभ्रतार; क्राफ्ट मेकिंग सिनिअर ग्रुपमध्ये रश्मी लोखंडे (धामणगाव, रेल्वे), स्वर्णा नागपुरे (भंडारा), किरण वासनिक (गोंदिया); ज्युनिअर ग्रुपमध्ये अर्णव मेश्राम (गोंदिया), विराज राऊत (गोंदिया), काजल कोरे (ठाणा); बौद्ध संस्कृती दर्शन सिनिअर ग्रुपमध्ये संदेश आझाद (गोंदिया), नीता गेडाम (गोंदिया), सीमा चौरे (गोंदिया); ज्युनिअर ग्रुपमध्ये पारूल कोटांगले (गोंदिया), हर्षल सतदेवे (गोंदिया), श्रेयश वासनिक (गोंदिया) तर बौद्ध प्रश्नोत्तरी सिनिअर ग्रुपमध्ये जया लोखंडे (धामणगाव), शुभम अहाके (लखनऊ, यूपी), सीमा चौरे (गोंदिया) व ज्युनिअर ग्रुपमध्ये श्रुती मेश्राम (धामणगाव रेल्वे), टिया कानेकर (साकोली) व अनामिका सतदेवे (मुंडीपार) यांनी घवघवीत यश मिळविले.
वृक्षारोपणात मिलिंद धावारे (लातूर), इंदिरा डोईफोडे (नागपूर), धनंजय दुर्योधन (राजुरा), गणवीर परिवार ( गुदमा), स्वर्णा नागपुरे (भंडारा), किरण वासनिक (गोंदिया), अनामिका सतदेवे (मुंडीपार), श्रुती मेश्राम (धामणगाव रेल्वे), काजल कोरे(ठाणा), हर्शल सतदेवे (गोंदिया), सोनाली बावने (गोंदिया), सुकेशिनी बोरकर (ब्रह्मपुरी), जया लोखंडे (धामणगाव रेल्वे);
बुद्ध वंदना-अभिवादन सजावटमध्ये सुकेशिनी बोरकर (ब्रह्मपुरी), लोपामुद्रा शहारे (नागपूर), इंदिरा डोईफोडे (नागपूर), धनंजय दुर्योधन (राजुरा), किसन मोरे (गोंदिया), मंगेश सतदेवे (गोंदिया), रिधांश उके (लोहारा); ‘बौद्ध बना बौद्ध दिसा’ वेषभूषामध्ये लिसहा राऊत (गोंदिया), विराज राऊत (गोंदिया), अक्षयंत नागपुरे (भंडारा), रौनक बन्सोड (ब्रह्मपुरी) यांनी बाजी मारली असून प्रोत्साहन पुरस्कारांसाठी प्रियंका गणवीर (गुदमा), नंदा मनवर (आर्वी), लायंदा लाडे (गोंदिया), प्रवीण राऊत (अदासी), तेजस्विनी संसारे (नाशिक), प्रतिमा रामटेके (कटंगी), सुजाता मेश्राम (धामणगाव), शुभम मेश्राम (ढाकणी) यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. दिशा गेडाम, आदेश गणवीर व संयोजक अतुल सतदेवे यांनी सहकार्य केले.