तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:15 PM2018-06-02T21:15:52+5:302018-06-02T21:15:52+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के एवढा लागलेला आहे. तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील १५३६ विद्यार्थी १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत बसले होते.

Results of the taluka 9 0.82 percent | तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के

तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे घवघवीत यश : १९ महाविद्यालयांतील १३९५ विद्यार्थी उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून यात तालुक्याचा निकाल ९०.८२ टक्के एवढा लागलेला आहे. तालुक्यातील एकूण १९ कनिष्ठ महाविद्यालयातील १५३६ विद्यार्थी १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेत बसले होते. त्यापैकी एकूण १३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यापैकी गुणवत्ता श्रेणीत ३६ प्रथम श्रेणीत ६६१, द्वितीय श्रेणीत ६७४ तर उत्तीर्ण श्रेणीत २४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
येथील सालेकसा ज्युनिअर कॉलेज मधील १७६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५ टक्के लागला. कावराबांध येथील जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज मधील ३८ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८९.४७ टक्के निकाल लागला. तिरखेडी येथील ग्राम विकास कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.९१ टक्के निकाल लागला असून येथील ४८ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. झालीया येथील गवराबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून येथील २४ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला विभागातून ६४ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७३.४३ टक्के निकाल लागला आहे. सोनपुरी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील ८७ पैकी ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९४.२५ टक्के निकाल लागला आहे. शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळाचा विज्ञान आणि कला दोन्ही शाखांचा १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत १३ पैकी १३ तर कला शाखेत ३६ पैकी सर्व ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मक्काटोला येथील पंचशील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ९५ टक्के लागला. विज्ञान शाखेतील ७० पैकी ७० तर कला शाखेतील ६३ पैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आमगाव खुर्द येथील श्रीनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील ३४ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७९.४१ टक्के निकाल लागला आहे. पिपरीया येथील श्यामसुंदर बोरकर वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.५६ टक्के निकाल लागला असून येथील ४१ पैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बिजेपार येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विज्ञान शाखेतून ३८ पैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेतून ३५ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९७.३६ टक्के तर कला शाखेचा ८२.८५ टक्के निकाल लागला आहे. कोटजमूरा येथील शहीद अवंती कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत ७८ पैकी ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेत २० पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथील शंकरलाल अग्रवाल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२२ पैकी ११३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९२.६२ टक्के निकाल लागला.
कावराबांध येथील लालसिंग मच्छिरके विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील ९८ पैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९८.९७ टक्के लागला. लोहारा येथील नारायणभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.१५ टक्के लागला असून येथील ५२ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरेकसा येथील श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाचा ९७.२६ टक्के निकाल लागला असून येथील ७३ पैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाकानिंबा येथील राणी अवंतीबाई कनिष्ठ महाविद्यालयातील ५८ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५.८६ टक्के लागला. कवराबांध येथील जी.के.विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १०६ पैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९६.२२ टक्के लागला. तर येथील एसआरबी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील ३७ पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेत १२ पैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९७.२९ टक्के तर कला शाखेचा ४१.६६ टक्के निकाल लागला आहे.
मौखिक परीक्षा होणार बंद
मौखिक परीक्षा कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्याना मौखिक परीक्षेत भरभरुन गुण देण्यात आले. त्यामुळे निकालाची टक्केवारी ९० वर गेली. मात्र पुढील सत्रापासून मौखिक परीक्षा बंद होणार असून टक्केवारी अशीच वाढलेली राहील का याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. मौखिक परीक्षा कायम राहावी अशी इच्छा सुद्धा काही पालक वर्ग व्यक्त करीत आहेत.

Web Title: Results of the taluka 9 0.82 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.