मूळ मालकास दागिने केले परत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:16+5:302021-05-18T04:30:16+5:30
गोंदिया : चोरीच्या गु्न्ह्यात आरोपींना पकडून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकास म्हणजेच फिर्यादीस परत केले. यांतर्गत ...
गोंदिया : चोरीच्या गु्न्ह्यात आरोपींना पकडून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकास म्हणजेच फिर्यादीस परत केले. यांतर्गत रामनगर पोलिसांनी चोरीच्या ३ घटनांतील फिर्यादींना त्यांचे दागिने परत केले आहे.
यामध्ये, फिर्यादी अजय होशीलालप्रसाद मिश्रा (४५,रा. गाडगेनगर) यांच्या घरी ३० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या घरफोडीत दोन लाख ३० हजार रूपयांचे दागिने चोरी गेले होते. प्रकरणात रामनगर पोलिसांनी आरोपींकडून हे दागिने जप्त केले होते. दुसऱ्या प्रकरणात, फिर्यादी दीपक मुन्नालाल श्रीवास (५१,रा.गौसिया मस्जीद, रामनगर) यांच्या घरातून ११ एप्रिल २०१२ रोजी २७ हजार ७९० रुपयांचा दागिने चोरीला गेले होते व पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले होते तर तिसऱ्या प्रकरणात अशरक जुम्मन शेख (६०,रा.रामनगर) यांच्या घरातून २७ मे २०१५ रोजी आठ हजार २९० रुपयांचे दागिने चोरीला गेले व पोलिसांनी ते जप्त केले होते. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक प्रमोग घोंगे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवलार यांच्या उपस्थितीत या तिघांना त्यांचे संपूर्ण दागिने फिर्यादींना परत करण्यात आले. यासाठी सहायक फौजदार नीळकंठ रहमतकर, नायक जावेद पठाण व महिला शिपाई अनिता कोसरकर यांनी सहकार्य केले.