परतीच्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात लाखोंचे धान भिजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:10 PM2019-12-26T12:10:56+5:302019-12-26T12:38:16+5:30
बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे धान खरेदी केंद्रात ठेवलेले धान भिजून ओलेचिंब झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राजीव फुंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे धान खरेदी केंद्रात ठेवलेले धान भिजून ओलेचिंब झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील आमगाव येथे शासकीय धानखरेदी केंद्र आहे. येथे शेतकऱ्यांनी आपापले धान आणून ठेवले आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसात धान भिजले. त्याला झाकायला पुरेशा ताडपत्री नसल्याने शेतकरीही हतबल झालेले दिसत होते. सालेकसा तालुका हा संपूर्णपणे धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. सध्या तेथील शेतांमध्ये धानाची मळणी सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात उघड्यावर ठेवलेल्या धानाची नासाडी झाली आहे.