लिलावातून मिळणार ४४ लाखांचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:08 PM2018-04-01T22:08:37+5:302018-04-01T22:08:37+5:30
जिल्ह्यातील आठवडी बाजारावर शुल्क आकारुन विकासावर खर्च करण्यासाठी आठवडी बाजारांचे कंत्राट ई-निविदेद्वारे देण्यात येणार आहे. सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ पैकी २३ बाजारांचा लिलाव करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील आठवडी बाजारावर शुल्क आकारुन विकासावर खर्च करण्यासाठी आठवडी बाजारांचे कंत्राट ई-निविदेद्वारे देण्यात येणार आहे. सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ पैकी २३ बाजारांचा लिलाव करण्यात आला आहे. या २३ बाजारांच्या लिलावातून ४३ लाख ७८ हजार ४७८ रुपयांचा महसूल जिल्हा परिषदेला मिळणार आहे. या लिलावातून शासकिय दरापेक्षा १३ लाख ४६ हजार ३८७ रुपये अधिक मिळणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेने आठवडी, बैठकी बाजार, पशु बाजार व यात्रा स्थळावर बाजार शुल्क वसूल करण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षासाठी ई-निविदा मागविल्या होत्या. यात २३ बाजारांचा लिलाव करण्यात आला आहे. यांतर्गत गोंदिया तालुक्यातील अदासी बाजाराचा लिलाव २७ हजार ५०१ रुपयांत करण्यात आला. यात शासकीय बोलीपेक्षा ५ हजार ७५७ रूपये जास्त मिळणार आहे. दासगाव बु. बाजाराचा लिलाव १ लाख ५५ हजार २५१ रुपयांत करण्यात आला. यात शासकीय बोलीपेक्षा ३९ हजार ९३५ रूपये जास्त मिळणार आहे. कामठा बाजाराचा लिलाव १ लाख २० हजार रुपयांत करण्यात आला. यात शासकीय बोलीपेक्षा ४५ हजार ९० रुपये जास्त मिळणार आहे. मुरदाडा बाजाराचा लिलाव १ लाख ११ हजार १११ रुपयात करण्यात आला असून यात ३७ हजार ७७७ रूपये जास्त मिळणार आहे. पांढराबोडी बाजाराचा लिलाव १ लाख २० हजार ३४ रुपयांत करण्यात आला असून यात ६ हजार रूपये जास्त मिळणार आहे.
रावणवाडी बाजाराचा लिलाव ३ लाख ३० हजार १३१ रुपयांत करण्यात आला असून यात शासकीय बोलीपेक्षा १ लाख २४ हजार ६५ रूपये जास्त मिळणार आहे. तिरोडा तालुक्यातील इंदोरा खु. बाजाराचा लिलाव २५ हजार ७९० रुपयात करण्यात आला असून यात ८ हजार ६ रूपये जास्त मिळणार आहे. मुंडीकोटा बाजाराचा लिलाव ३ लाख ७६ हजार ८९० रुपयांत करण्यात आला असून यात ११ हजार ३२४ रूपये जास्त मिळणार आहे. सुकडी-डाक. बाजाराचा लिलाव ८६ हजार १०० रुपयांत करण्यात आला असून यात १४ हजार ८६६ रूपये जास्त मिळणार आहे. वडेगाव बाजाराचा लिलाव ३ लाख ८ हजार ६३४ रुपयांत करण्यात आला असून यात १ हजार रुपये जास्त मिळणार आहे. सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द बाजाराचा लिलाव ५ लाख १ हजार ५०० रुपयांत करण्यात आला असून २ लाख ४४ हजार ६० रुपये जास्त मिळणार आहे.
कोटजंभूरा बाजाराचा लिलाव २० हजार ५ रुपयांत करण्यात आला असून यात ६ हजार ४३९ रुपये जास्त मिळणार आहे. साखरीटोला बाजाराचा लिलाव ३ लाख १ हजार १०० रुपयांत करण्यात आला असून यात १ लाख १९ हजार ६३६ रुपये जास्त मिळणार आहे. देवरी तालुक्यातील चिचगड बाजाराचा लिलाव ३ लाख ५० हजार रुपयांत करण्यात आला असून यात १ लाख ६६ हजार ३०० रुपये जास्त मिळणार आहे. ककोडी बाजाराचा लिलाव २ लाख ५५ हजार रुपयांत करण्यात आला असून यात ८५ हजार ४९० रुपये जास्त मिळणार आहे. सावली डोंगरगाव बाजाराचा लिलाव १ लाख ३ हजार रुपयांत करण्यात आला असून यात ३१ हजार ५०० रुपये जास्त मिळणार आहे. गोरेगाव तालुक्यातील चोपा बाजाराचा लिलाव ८० हजार १३१ रुपयांत करण्यात आला असून यात २९ हजार ६७७ रुपये जास्त मिळणार आहे. कुºहाडी बाजाराचा लिलाव १ लाख ४६ हजार रुपयांत करण्यात आला असून यात ५४ हजार ७९६ रुपये जास्त मिळणार आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी बैठकी बाजाराचा लिलाव १ लाख २५ हजार रुपयांत करण्यात आला असून यात २७ हजार ७९६ रूपये जास्त मिळणार आहे.
पांढरी येथील पशु बाजाराचा लिलाव ६ हजार ८०० रुपयांत करण्यात आला असून यात ५४ रुपये जास्त मिळणार आहे. सौंदड बाजाराचा लिलाव २ लाख ३१ हजार रुपयांत करण्यात आला असून यात ८६ हजार ५३४ रुपये जास्त मिळणार आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड बाजाराचा लिलाव १ लाख १ हजार रुपयांत करण्यात आला असून यात शासकीय बोलीपेक्षा ५ हजार ३०० रूपये जास्त मिळणार आहे.
तीन बाजारांचा लिलाव स्थगीत
सालेकसा तालुक्यातील जमाकुडो या बाजाराची शासकीय बोली ५ हजार ६४६ आहे. परंतु हे बाजार स्थगीत आहे. सुकडी-डाकराम यात्रा स्थळ या बाजाराची शासकीय बोली ३ हजार ४१० रुपये तर गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा येथील यात्रा स्थळाची बोली २ हजार १०९ रुपये आहे. परंतु या बाजारांवरही स्थगिती आहे.