उत्कर्षच्या सर्वसाधारण सभेत बचत गटांचा आढावा
By admin | Published: June 26, 2016 01:35 AM2016-06-26T01:35:52+5:302016-06-26T01:35:52+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत आयपॅड सहाय्यित तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कर्ष ...
गोंदिया : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत आयपॅड सहाय्यित तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंदिया येथे घेण्यात आली. सभेचे उदघाटन गटविकास अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले.
अध्यक्षस्थानी वैनगंगा कृष्णा ग्रामीण विकास बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी चिंधालोरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून सतीश मार्कंड, एन.डी. बांगरे, उत्कर्षच्या अध्यक्ष अल्का रंगारी, सचिव अनिता बडगे उपस्थित होते. सभेत विविध महिला बचतगटांनी केलेली बचत, उभारलेले उद्योग, व्यवसाय, उत्पादित मालाची बाजारपेठेत केलेली विक्री, बँकाची झालेली मदत, घेतलेल्या कर्जाची सुरु असलेली परतफेड, ग्रामसंस्थांच्या माध्यमातून गावात सुरु असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.
सभेला गोंदिया तालुक्यातील ८५० बचत गटातील महिलांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी आशिष बारापात्रे, लेखापाल हेमलता पडोळे, सुनीता कटरे, सुर्यकांता मेश्राम, दुर्गा रंगारी, गीता भोयर, पुनम साखरे, रोहिणी साखरे, शालू मेश्राम, कुंजलता भुरकुडे, तेजेश्वरी येरपुडे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक मोनिता चौधरी, संचालन उपजीविका समन्वयक कुंदा डोंगरे तर आभार चित्रलेखा जगतेले यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)