६० हजार विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान स्पर्धेची संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:37+5:30
या उपक्रमात शिक्षक व पालकांचे सहकार्य मिळत असल्याने ऑनलाईन स्टडी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घरी राहून ज्ञानार्जनाचे करीत आहेत. दररोज विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जात आहे. १३ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षेसाठी कहुत अॅप तयार करून अॅपद्वारे लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यशवंत मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाच्यावतीने संचारबंदी लागू करून ३ मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची खबरदारी म्हणून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवून नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या संकल्पनेतून १३ एप्रिलपासून शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या मार्गदर्शनात आॅनलाईन उपक्रम राबविला जात आहे.यामुळे जवळपास ६० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.
या उपक्रमात शिक्षक व पालकांचे सहकार्य मिळत असल्याने ऑनलाईन स्टडी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घरी राहून ज्ञानार्जनाचे करीत आहेत. दररोज विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जात आहे. १३ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सामान्य ज्ञान परीक्षेसाठी कहुत अॅप तयार करून अॅपद्वारे लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय म्हणून देशात संपूर्ण लॉकडाऊन आहे. विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्यात आली. परंतु शैक्षणिक सत्रात अभ्यासक्र म पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने वर्क फॉर्म होम ऑनलाईन स्टडी हा उपक्र म केला आहे. मोबाईलमध्ये व्हाटसअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार केले जात आहे. या माध्यमातून संबधित शिक्षक त्यांना आॅनलाईन स्टडी उपक्र मातंर्गत शिक्षण देत आहे. इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग असून जिल्ह्यात एकूण ६० विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढावे व त्यांना विविध क्षेत्रातील नवनवीन प्रश्न व उत्तरांची माहिती व्हावी यासाठी आॅनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा उपक्रमास सुरूवात करण्यात आली आहे. विद्यार्थी आपल्या घरूनच यात सहभाग नोंदवून परीक्षा देत आहेत. दररोज ही परीक्षा घेण्यात येत असून स्पर्धेची प्रश्नावली तयार करणे व संनियंत्रण गौतम बांते करीत आहेत. आमगाव तालुक्यातील इयत्ता ६ ते ८ च्या ५ हजार २६८ विद्यार्थ्यांना आॅनलाईन सामान्य ज्ञान प्रश्नावली हाताळण्यासाठी गटशिक्षणाधिकारी वाय. सी. भोयर यांच्या नियंत्रणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.