कंत्राटी समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांचे अधिकार रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:33+5:302021-07-19T04:19:33+5:30
सडक-अर्जुनी : कंत्राटी समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती ११ महिन्यांकरिता करण्यात आली असून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान (मुंबई) सहसंचालक डॉ. ...
सडक-अर्जुनी : कंत्राटी समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती ११ महिन्यांकरिता करण्यात आली असून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान (मुंबई) सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी अवाजवी अधिकार दिल्यामुळे पुढे याचे गंभीर परिणाम होणार. यामुळे त्यांचे अधिकार रद्द करावे, अशी मागणी जिल्हा परिषद आरोग्य सेवक-सेविका कर्मचारी संघटना तालुका शाखेने केली असून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी प्रा.आ केंद्र २०२० पर्यंत आरोग्य आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतरित करण्यात आले आहेत. परंतु त्यांना अधिकचे अधिकार देण्यात आल्यामुळे आरोग्य सेवक-सेविकांवर अतिक्रमण होत आहे. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत अधिकाराचे दुहेरीकरण झाले आहे. करिता यांना दिलेले अधिकार कमी करण्याची मागणी करण्यात संघटनेने केली असून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्ष आर.एस. रोखडे, उपाध्यक्ष एस. कावळे, सचिव मडावी, कोषाध्यक्ष बी.ए. पुस्तोडे, सदस्य एस.पी. फुंडे, एस.एन. गेडाम, एन.एम. दिघोरे, बी.ए. शहारे, शालू डोंगरवार, मालती भराडे, आरोग्य सेविका पंचबुद्धे, शिवणकर, ए. ठाकरे, भगत आदी उपस्थित होते.