राईस मिलर्सच्या मागण्या मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:35 AM2021-02-17T04:35:30+5:302021-02-17T04:35:30+5:30

गोंदिया : पूर्व विदर्भातील राईस मिलर्स असोसिएशनने मागील वर्षीचे थकीत इन्सेटिव्ह देण्यात यावे, धान भरडाईचे दर निश्चित करावे आणि ...

Rice Millers' demands will be met | राईस मिलर्सच्या मागण्या मार्गी लावणार

राईस मिलर्सच्या मागण्या मार्गी लावणार

Next

गोंदिया : पूर्व विदर्भातील राईस मिलर्स असोसिएशनने मागील वर्षीचे थकीत इन्सेटिव्ह देण्यात यावे, धान भरडाईचे दर निश्चित करावे आणि मागील तीन वर्षांपासून थकीत असलेेले वाहतूक भाडे देण्यात यावे. या मागणीला घेऊन राईस मिलर्सने शासकीय धानाची उचल करुन भरडाई करणे बंद केले आहे. याच विषयावर तोडगा काढण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने मुंबई मंत्रालयात मंगळवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ना.भुजबळ यांनी राईस मिलर्सच्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

राईस मिलर्स असोसिएशनच्या मागण्यांवर त्वरित तोडगा निघून शासकीय धान भरडाईची समस्या दूर व्हावी याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासाठी मंगळवारी (दि.१६) मुंबई मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खा. प्रफुल्ल पटेल, पाचही जिल्ह्यातील राईस मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी व अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राईस मिलर्सच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या मागण्यांना प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन ना.भुजबळ यांनी राईस मिलर्स असोसिएशनच्या सदस्यांना दिले. तसेच आंदोलन मागे घेत शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धानाची उचल करुन भरडाई करण्यास सांगितले. त्यामुळे आता राईस मिलर्सचे आंदोलन लवकरच मागे घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Rice Millers' demands will be met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.