आकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:18 PM2017-12-04T22:18:18+5:302017-12-04T22:20:29+5:30

आकाशगंगेतील ताºयांचा वेग न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार ताºयांपासून अंतर लांब गेले तर त्याच्या वेग कमी होते.

The riddle of the galaxy appears to be unraveled | आकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले

आकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले

Next
ठळक मुद्देप्राचार्य मुंडासे यांचे संशोधन : गुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धांत

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : आकाशगंगेतील ताऱ्यांचा वेग न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार ताºयांपासून अंतर लांब गेले तर त्याच्या वेग कमी होते. आइंस्टीन च्या सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांतानुसार सुध्दा वेग कमी होतो हे सांगितले आहे. परंतु सर्व तारे वेगाने फिरत असतात. दोघांच्या सिध्दांतानुसार ताºयांचा वेग स्पष्ट नाही. आकाशगंगेत डार्क मॅटर (कृष्णद्रव्य) मुळे तारे वेगाने फिरत असल्याची धारणा जगातील शास्त्रज्ञांची आहे. परंतु डार्क मॅटरचे अस्तित्व स्पष्ट नाही.
गोंदियाच्या औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशगंगेतील दूर व अतिदूर असणारे दिर्घीका मधील तारे जोमाने फिरतात याचे निरीक्षक तज्ज्ञांद्वारे करण्यात आले. सर्वात आधी जॉन हेंरिक उर्ट यांनी १९३२ मध्ये केले होते. त्यानंतर होरॉस बैककॉक यांनी १९३९, लुईस वोल्डर १९५९ व वेरा रूबीन यांनी १९७० मध्ये संशोधन करून ताºयांची गतीचे मापन करून निरीक्षण केले. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत व आइंस्टीनच्या सर्वसाधारण सापेक्षता सिद्धांतानुसार ताºयांची गतीला स्पष्ट केल्या जाऊ शकत नाही. गती संदर्भात मोर्देहोई मिलोग्राम (१९८३) व लॉरेंटिस कडून मांडलेले दोन्ही सिध्दांत लागू होत नाही. आकाशगंगेत डार्क मॅटर (कृष्ण द्रव्य) च्या अस्तित्वाचा शोध जगातील प्रयोगशाळेत करण्यात आले परंतु डार्क मॅटर च्या अस्तित्वाबाबत ८५ वर्षापासून यश मिळाले नाही. डार्क मॅटर चे वजन सर्वसाधारण द्रव्य च्या तुलनेत पाच पट अधिक होत असल्याचा अंदाज आहे. काही विशेषज्ज्ञांच्या मते डार्क मॅटर चे अस्तित्वच नसल्याचे म्हटले जाते. डार्क मॅटर भौतिक विशेषज्ञांच्या मूलभूत विचारामुळे शक्य नाही.
१४ महिन्यापर्यंत केले संशोधन
प्राचार्य मुंडासे यांनी अत्यंत कठीण व गहन विषयाला घेऊन १४ महिन्यापर्यंत संशोधन केले. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा नविन सिंद्धात मांडला. सिद्धांतानुसार ताºयांचा प्रकाश एक सेकंदात ३ लाख वेगाचा आहे. या सिध्दांताद्वारे आकाशगंगेत ताऱ्यांचा वेग अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. या सिद्धांतानुसार वेळेच्या व दूरच्या ताºयांमध्ये वेगासंदर्भात काहीच अंतर नाही. या सिद्धांतानुसार डार्क मॅटर घटकाची गरजच नसल्याचे मुंडासे म्हणाले. या सिद्धांतानुसार आकाशगंगेत केंद्राच्या जवळ व दूर असणाऱ्या ताऱ्यांचा वेग सहजरित्या मोजू शकतात असे ते म्हणाले.

Web Title: The riddle of the galaxy appears to be unraveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.