माहिती अधिकाराची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली

By admin | Published: August 2, 2016 12:26 AM2016-08-02T00:26:03+5:302016-08-02T00:26:03+5:30

सहापैकी पाच नातलगांनी त्यांच्या नावे झालेली वडिलोपार्जित जमीन विक्री केली. मात्र ज्या भावाने जागा

Right to Information Officers | माहिती अधिकाराची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली

माहिती अधिकाराची अधिकाऱ्यांकडून पायमल्ली

Next

गोंदिया : सहापैकी पाच नातलगांनी त्यांच्या नावे झालेली वडिलोपार्जित जमीन विक्री केली. मात्र ज्या भावाने जागा विक्री केली नाही, त्या भावाचे व त्याच्या आईचे नाव सातबारा रेकार्डवरून कमी करण्यात आले व ज्यांनी जागा विक्री केली त्यांचे नाव पुन्हा त्या रेकार्डवर चढविण्यात आले. माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत केलेला अर्जसुद्धा गहाळ झाला. असा मोठाच गलथान कारभार आमगाव तालुक्याच्या तहसील कार्यालयात सुरू आहे.
आमगाव तालुक्याच्या सरकारटोला येथील रहिवासी पवन विठोबा मानकर यांच्या मालकीच्या जमिनीवर पूर्वीपासून त्यांची जोत आहे. तलाठी साजा-७ अंतर्गत गट क्र-३३०, आराजी ०.२३ हे.आर. हक्क वर्ग-१, लगान ०.३५ प्रमाणे कास्तकारी जमीन त्यांना वडिलोपार्जित हिस्स्यातून मिळाली. त्यांचे नातलग हिरालाल मानकर, प्रेमलाल मानकर, रोशनलाल मानकर, गेंडलाल मानकर व तुरसा रामलाल मानकर यांचे नाव शासकीय सातबारा रेकार्डमध्ये नोंद होते. हळूहळू त्यांनी आपल्या हिस्स्यातील जमीन विक्री केल्यावर त्यांची नावे सातबाऱ्यावरून कमी करण्यात आले. परंतु पवन मानकर यांचे नाव जमीन विक्री केले नाही म्हणून कायम होते. परंतु कालांतराने सदर पाचही जणांचे नाव सातबाऱ्यावर समाविष्ट करण्यात आले व पवन मानकर व त्यांच्या आईचे नाव कापण्यात आले. ही घोळचूक दफ्तर दिरंगाईतून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे त्यांना पीक नुकसान भरपाईचे अनुदान मिळत नाही. त्यामुळे त्यांनी तलाठ्यांकडे चौकशी केल्यावर ही घोळचूक त्यांच्या लक्षात आली. त्यांनी २८ एप्रिल २०१४ रोजी तहसीलदारांकडे तक्रार केली. परंतु तत्कालीन तहसीलदार, तलाठी व नातलग यांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याने त्यांचे व त्यांचा आईचे नाव सातबारावरून कमी करण्यात आले, असा आरोप पवन मानकर यांनी केला आहे. पवन मानकर व सुरजा विठोबा मानकर या मायलेकांचे नाव सातबाऱ्यावर पूर्वी कायम होते. तसेच नातलगांचे नाव कमी झाल्याची नोंद होती. परंतु नातलगांनी आपल्या वाट्याची जमीन विक्री केल्यावर नवीन सातबारा रेकार्डवर मायलेकाचे नाव गायब आहे. प्रकरणाची सत्यता जाणण्यासाठी ११ जानेवारी २०१६ रोजी संघटनेतर्फे त्यांनी माहिती अधिकारांतर्गत तहसीलदार शक्करवार यांच्याकडे अर्ज केला. मात्र त्यांनी तलाठी साजा-७ ज्या नायब तहसीलदाराकडे येतो त्यांना द्या, असे सांगितले. मात्र नायब तहसीलदारांना दिल्यावर त्यांनी सदर अर्ज गायब झाल्याचे सांगून अर्जाच्या झेरॉक्स प्रति मागितल्या.
त्या दिल्यावरही तलाठ्यांकडून माहिती येण्यास आहे, असे सांगून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान शक्करवार यांची बदली झाली व नवीन तहसीलदार म्हणून राठोड रूजू झाले. मात्र त्यांनीही माहिती अधिकारांतर्गत माहितीची मूळ प्रत पाठवित असल्याचे कळवून मूळ प्रत पाठविलीच नाही व दिशाभूल करण्यात आली.
त्यामुळे पवन मानकर यांना मोठाच मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार त्यांनी २ जून २०१६ रोजी जिल्हाधिकारी व आयुक्त नागपूर यांना केली आहे. सदर माहिती महाराष्ट्र लालबावटा शेतकरी युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Right to Information Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.