संस्थेच्या धान खरेदीचे अधिकार आता महामंडळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:48 PM2018-12-26T21:48:04+5:302018-12-26T21:48:18+5:30
स्थानिक आदिवासी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामुळे या संस्थेचे धान खरेदी करण्याचे अधिकार आता महामंडळाने आपल्याकडे घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : स्थानिक आदिवासी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामुळे या संस्थेचे धान खरेदी करण्याचे अधिकार आता महामंडळाने आपल्याकडे घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
येथील आदिवासी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामुळे येथील धान खरेदी केंद्र आदिवासी विकास महामंडळाने बंद केले होते. याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. बुधवारी (दि.२६) संस्था परिसरात चौकशीसाठी आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी येथे दाखल झाले होते. या वेळी मंडळाच्या अधिकाºयांनी सदर संस्थेकडचे धान खरेदी करण्याचे अधिकार काढून घेतले. महामंडळ स्वत: येत्या चार दिवसात धान खरेदी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील केंद्र बंद झाल्याने या परिसरातील शेतकºयांसमोर धान कुठे विक्री करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र महामंडळाच्या निर्णयामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
मात्र बाराभाटी संस्थेच्या आवारातील धानाची विल्हेवाट अद्यापही लावण्यात आली नाही. महामंडळाने सिल लावलेल्या गोदामातील धानाची परत मोजणी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
या वेळी प्रादेशिक व्यवस्थापक एस.एस.आंबेकर, उपप्रादेशिक व्यवस्थापक राहुल पाटील, पी.पी.गडे, स्थानिक संचालक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.