मुलांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका, काय आहेत लक्षणे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 03:39 PM2024-10-10T15:39:24+5:302024-10-10T15:41:22+5:30
सर्व उपचार करा मोफत : बालस्वास्थ्य कार्यक्रम ठरतेय संजीवनी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजना ० ते १८ वयोगटातील • कॉक्लिअर इम्प्लांटसह पोट, आजारांनी ग्रासलेल्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. मुला मुलींसाठी संजीवनी ठरत आहे. हृदयावरील शस्त्रक्रियांसह, जन्मतच शाळकरी मुलांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्यात व त्यांना जडणाऱ्या आजाराचे वेळीच निदान करून त्यावर शस्त्रक्रिया करता यावी. यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम हाती घेतला आहे.
सन २०२४ च्या एप्रिल सप्टेंबर अखेर या सहा महिन्यांत २५ हृदयशस्त्रक्रिया, २४४ इतर शस्त्रक्रिया, तीन कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्यांना मशीन देण्यात आली आहे. मुलांवर डोळ्यांच्या विकारासह अन्य ० ते १८ वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश आहे.
अंगणवाडी व शालेय मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यात आढळून आलेल्या आजारांना प्रतिबंध लावण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेशी संबंधित मुलांची यादी तयार केली जाते. त्याच्यावरील शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाते. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत २५ बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया यंदा करण्यात आल्या, अशी माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक संजय बिसेन यांनी दिली आहे.
उपचारासाठी कोणाला भेटाल?
आरबीएसके कार्यक्रमांतर्गत मोफत उपचा रासाठी अंगणवाडी सेविका, शासकीय शाळेतील मुख्याध्यापक, जिल्हा शल्यचि- कित्सक किंवा आरोग्य उपसंचालक यांना भेटावे. प्रत्येक शैक्षणिक वर्षांत अंगणवाडी बालकासाठी दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणी केली जाते.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम
शाळकरी मुलांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्यात आणि त्यांना जडणाऱ्या आजाराचे वेळीच निदान करून त्यावर शस्त्रक्रिया करता यावी यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हाती घेतला आहे.
२५ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया
सन २०२४ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ४० मुलांमध्ये हृदयविकार आढळला आहे. त्यातील २५ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
तीन कॉक्लिअर इम्प्लांट
ज्या लहान बालकांना ऐकू येत नाही अशा लहान बालकांची सर्जरी अत्यंत महागडी असते. १० लाखांच्या घरात ही सर्जरी असते. अशा तीन बालकांच्या सर्जरी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आल्या.
४० मुलांमध्ये आढळला हृदयविकार
- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यात (आरबीएसके) ० ते १८ या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी करून या योजनेतून मोफत उपचार केले जातात.
- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीच्या बालकांची वर्षातून दोन वेळा तर शाळांतील मुलांची तपासणी वर्षातून एकदा करण्यात येते.
- शालेय आरोग्य तपासणीतून बालकांना काय आजार आहे याची माहिती पुढे येते. सहा महिन्यात ४० बालकांना हृदयविकार असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.
"राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या दुर्धर आजार असलेल्या विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. या कार्यक्रमामुळे पालकांच्या परवानगीने मोफत शस्त्रक्रिया करून आतापर्यंत शेकडो मुलांना नवजीवन मिळाले."
- संजय बिसेन, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम.