रस्त्यावर धोकादायक वाहने चालविणाऱ्यांंवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:36 PM2018-10-29T21:36:58+5:302018-10-29T21:37:18+5:30
रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहने उभे करणाºया वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहने उभे करणाºया वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेलटोलीच्या रेल्वे स्टेशन रस्त्यावर एमएच ३५/३०३७ या वाहनाला आरोपी संतोष छोटेलाल उके (५०) रा. कटंगी बुध्द विहाराजवळ गोंदिया याने उभे करुन ठेवले. काटी येथे एमएच ३५/के-२४८८ या वाहनाला अनिलकुमार जगदिश अंबुले (२९) रा. गिरोला याने उभे करुन ठेवले होते. तसेच आॅटो क्र.एमएच ३५/के-४२९६ ला गजेंद्र रामू नेवारे (२६) रा. बाजारटोला याने उभे करुन ठेवले होते. चिचगड येथील बसस्थानकावर आॅटो एमएच ३१/सीव्ही-७६७४ ला आरोपी लतीफ अब्दुल रज्जाक शेख (३१) रा. चिचगड याने, आॅटो एमएच ३५/२९२६ या वाहनाला मोहसीन आसीखा पठाण (२९) रा. देवरी याने, देवरीच्या नगरपंचायत इमारतीसमोर काळी पिवळी एमएच ३५/२५९१ ला आरोपी शैलेश उमाशंकर तिवारी(३९) रा.देवरी याने, देवरीच्या बसस्थानकावर एमएच ३५/३४४४ या वाहनाला वाहन चालक अरविंद भागवत ब्राम्हणकर (२७) रा. दुर्गुटोला याने, एमएच ३६/३२२७ ला या वाहनाला चंदू जगन ब्राम्हणकर (३५) रा.साखरीटोला, राधीका हॉटेलसमोर एमएच ३५/२६०१ या आॅटोला आरोपी विनोद दुलीचंद राऊत (२८) देवरी याने, सालेकसा बसस्थानकावर मेटाडोर एमएच ३५/६२१ ला आरोपी प्रदीप हिवराज शेंडे (२८) रा.मुरपार याने, कावराबांध बसस्थानकावर एमएच ३५/४१३८ या वाहनाला मुकेश फुलीचंद लिल्हारे(२९) रा. मुंडीपार याने,गोंदियाच्या गांधी प्रतिमासमोर आॅटो एमएच ३५/एएच-००२३ या वाहनाला प्रथम जितेंद्र मेश्राम (२९) रा. गोंदिया याने, काटी येथे एमएच २०/डीई-००६५ या वाहनाला यशवंतराव दशरथ नागपुरे(३३) रा. लहीटोला याने, कामठा चौक आमगाव येथे एमएच ३५/एएच-०२७६ या वाहनाला धनराज मयाराम चकोले (४३) रा. सालेकसा याने, परसवाडा येथे एमएच ३५/३१४४ या वाहनाला रुपेश लंकेश्वर मेश्राम (३०) रा. तिरोडा याने, एमएच ३५/२७१७ या वाहनाला अविनाश प्रेमलाल बापीसताले (४०) रा. चांदोरी याने, जुबेद युसूफ कुरैशी (२८) याने एमएच ३५/एएच-०३१६ या वाहनाला, घोसीटोला येथे एमएच ३५/३००५ या वाहनाला लोकराम दयाराम पारधी (५०) रा.घोसीटोला याने, हरदोली बसस्थानकावर आॅटो एमएच ३५/१५१० या वाहनाला आरोपी रियाज बाबा खान पठाण (४०) रा. गोरेगाव याने,सालेकसा बसस्थानकावर ट्रक एमएच ३५/जी-६३७४ या वाहनाला आरोपी भैसारे(३५)रा. सालेकसा याने, शेंडा चौक सडक-अर्जुनी येथे एमएच ३५/३३७२ या वाहनाला जितेंद्र हिरामन चुटे(३२) रा. बाम्हणी याने धोकादायक स्थितीत वाहन उभे करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तक्रारीवरुन सदर आरोपीविरुध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.