सडक-अर्जुनी न.प.चा गलथान कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:42 AM2018-09-19T00:42:40+5:302018-09-19T00:43:22+5:30

येथील नगरपंचायतमध्ये अद्यापही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने सध्या नायब तहसीलदार मेश्राम यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार आहे. तर गावातील विकास कामे आणि स्वच्छतेकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाले असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे.

Road-Arjunction of Govt | सडक-अर्जुनी न.प.चा गलथान कारभार

सडक-अर्जुनी न.प.चा गलथान कारभार

Next
ठळक मुद्देसिमेंट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट : प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवर भार

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : येथील नगरपंचायतमध्ये अद्यापही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने सध्या नायब तहसीलदार मेश्राम यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार आहे. तर गावातील विकास कामे आणि स्वच्छतेकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाले असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या गृह गावातील ही नगर पंचायत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सडक-अर्जुनी नगरपंचायतच्या निर्मितीला तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही नगरपंचायतची अवस्था अतिशय बिकटआहे. बऱ्याच दिवसांपासून शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेंडा रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून नाली नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर साचते.
दुसरीकडे नगरपंचायत प्रभाग क्रं. १४ मधील मनोहर डोंगरवार ते संजय प्रधान यांचे घरापर्यंत १५० मी. सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्ता बांधकामासाठी १० लाख रुपये मंजूर आहे. मात्र सदर रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्ता बांधकामासाठी वापरलेली गिट्टी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे. या सिमेंट रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची प्रयोगशाळेत तपासणी अधिकाऱ्यांनी केली नाही. भर पावसाळ्यात या रस्त्याचे बांधकाम सुरु करण्याचा नेमका उद्देश काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Road-Arjunction of Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.