सडक-अर्जुनी व देवरी तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:20+5:302021-06-16T04:38:20+5:30

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला असून जिल्हाही यापासून सुटलेला नाही. कोरोनाच्या कहरामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४१०४७ ...

Road-Arjuni and Deori talukas on the way to coronation | सडक-अर्जुनी व देवरी तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

सडक-अर्जुनी व देवरी तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Next

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला असून जिल्हाही यापासून सुटलेला नाही. कोरोनाच्या कहरामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४१०४७ एवढी झाली असून ३९७ नागरिकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. असे असतानाच मात्र आता जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. परिणामी दररोजच्या बाधितांची आकडेवारी सातत्याने घटताना दिसत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सडक-अर्जुनी व देवरी या तालुक्यांत सोमवारी प्रत्येकी ४ क्रियाशील रुग्णांची नोंद होती. यामुळे हे दोन तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.

----------------------

आतापर्यंत केलेल्या चाचण्या - १८०५९४

बाधित होण्याचे प्रमाण -

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - ९७.८५

- एकूण रुग्ण - ४१०४७

बरे झालेले रुग्ण - ४०२२७

उपचार सुरू असलेले रुग्ण - १२३

मृत्यू - ६९७

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट -

कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर- २

-----------------------------

तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण

गोंदिया - ३८

तिरोडा - १२

गोरेगाव- ११

आमगाव- २१

सालेकसा- १६

देवरी- ४

सडक-अर्जुनी- ४

अर्जुनी-मोरगाव- १३

-----------------------------

आमगाव तालुक्यात चढ-उतार सुरूच

जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून बाधितांची संख्या कमी होत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अन्य सर्वच तालुक्यांत बाधितांची संख्या कमी झाली असताना, आमगाव तालुक्यात मात्र रुग्ण संख्येत चढ-उचार सुरूच आहे. विशेष म्हणजे, हॉट स्पॉट असलेल्या गोंदिया व तिरोडा तालु्क्यात रुग्ण बरेच घटले आहेत.

----------------------------

जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून यामुळेच आता दररोजच्या बाधितांची संख्याही खूपच कमी झाली आहे. परिणामी राज्य शासनानेही जिल्ह्यात अनलॉक केले आहे. मात्र यानंतरही नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरीही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये.

- डॉ. नितीन कापसे

जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया

Web Title: Road-Arjuni and Deori talukas on the way to coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.