सडक अर्जुनीत एमआयडीसी प्रक्रियेला होणार सुरुवात

By admin | Published: August 13, 2016 12:07 AM2016-08-13T00:07:44+5:302016-08-13T00:07:44+5:30

आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागासलेल्या तालुक्यांमध्ये सडक अर्जुनीचा समावेश आहे.

Road to begin arduous MIDC process | सडक अर्जुनीत एमआयडीसी प्रक्रियेला होणार सुरुवात

सडक अर्जुनीत एमआयडीसी प्रक्रियेला होणार सुरुवात

Next

राजकुमार भगत सडक अर्जुनी
आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागासलेल्या तालुक्यांमध्ये सडक अर्जुनीचा समावेश आहे. अशा तालुक्याचा बदल घडविण्यासाठी औद्योगिक विकास महत्वाचा आहे. त्याकरिता सडक अर्जुनी तालुक्यात एमआयडीसी निर्माण होण्याच्या हालचालींना वेग येत आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्याकडे त्यासाठी सूचना करून पाठपुरावा करायला सुरुवात केल्याची माहिती आहे.
सडक अर्जुनी तालुक्याची निर्मिती १५ आॅगस्ट १९९२ ला झाली असून सडक अर्जुनी तालुक्यात १०८ गावे असून ६४ ग्रामपंचायती आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या १ लाख १५ हजार ५९४ आहे. सदर तालुका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असून या तालुक्याचा आतापर्यंत कोणताही विकास झाला नसून आजपर्यंत या तालुक्यात शेती हाच एक पर्याय आहे. त्यामध्येही धानाची शेती असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी धानाला भाव नसल्यामुळे हथबल झाला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यात औद्योगिक क्षेत्र नसल्यामुळे तालुक्यातील मजुर वर्ग बेरोजगार आणि सुशिक्षीत बेरोजगार शहरी भागात कामाच्या शोधासाठी नियमित जात असतात. धानाचा हंगाम वगळता तालुक्यातील मजुर वर्गाला काम नाही. त्यामुळे तालुक्यातील आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. तालुक्यात एमआयडीसी झाल्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही. बाहेरगावी जाणारा मजुर ही आपल्या गावी काम असेल तर बाहेर जाणार नाही. अनेक बेरोजगार लोकांना काम मिळेल. आणि साखर कारखाना असेल तर उस लागवड होऊन शेतकऱ्यांना पन जास्त पैसे मिळतील. दाळ मिल असेल तर त्याचा फायदा शेतकरी मजुर आणि व्यवसायीकांना होईल. याकरिता एमआयडीसीची नितांत गरज असल्याचे दिसून येते.
जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे सडक अर्जुनी तालुक्याचे असल्यामुळे त्यांनी कोणताही पक्षभेद न ठेवता सडक अर्जुनीच्या सारख्या ग्रामीण भागातील विकासाकरिता एमआयडीसीच्या उभारणीकरिता प्रयत्न करावे, अशी अपेक्षा तालुकावासीयांकडून केली जात आहे.

एमआयडीसी तालुक्यात सुरु होण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले प्रयत्न करीत आहे. त्यांनी जिल्हा कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल केल्याची माहिती आहे. त्याकरिता जागेचा शोध घेणे सुरु आहे.
- कविता रंगारी
सभापती, पंचायत समिती सडक अर्जुनी

एमआयडीसीशिवाय सडक अर्जुनी तालुक्याचा विकास अशक्य आहे. त्याकरिता तालुक्यात सडक अर्जुनी- गोंदिया रोडवरील खजरी ते वृंदावनटोला या परिसरातील जागा सोईस्कर होवू शकते.
- राजेश नंदागवळी
माजी समाजकल्याण सभापती. जि.प.

Web Title: Road to begin arduous MIDC process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.