संविधान सन्मानासाठी हलबा उतरणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:28 AM2017-12-02T00:28:11+5:302017-12-02T00:28:23+5:30
आदिवासींना संविधानाने न्याय व हक्क दिले. तरी सरकारने हिंदूच्या नावाखाली हलबा, हलबी आदिवासींना खोटे ठरविले. हे कृत्य संविधानविरोधी आहे. आदिम समाजाचे जीवन उध्वस्त होत आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : आदिवासींना संविधानाने न्याय व हक्क दिले. तरी सरकारने हिंदूच्या नावाखाली हलबा, हलबी आदिवासींना खोटे ठरविले. हे कृत्य संविधानविरोधी आहे. आदिम समाजाचे जीवन उध्वस्त होत आहे. या अन्यायाविरूद्ध १३ डिसेंबरला विधानसभेच्या रस्त्यावर लाखोंच्या संख्येने विराट मोर्चा राहील. संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे, असे प्रतिपादन अॅड. नंदा पराते यांनी केले.
राष्टÑीय आदिम कृती समितीच्या माध्यमाने संविधान सन्मानासाठी जिल्ह्यात प्रचार दौरा घेण्यात आला. याप्रसंगी हलबा समाज बैठकीत त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, प्राचीन इतिहासानुसार हलबा खरे आदिवासी आहेत. मात्र केवळ हिंदू धर्माला मानतात म्हणून सरकार हलबांना बोगस ठरवत आहे. ही बाब संविधानविरोधी आहे. गोंड समाजाने बांबूपासून विणकाम केले. प्रधानानेसुद्धा वाजंत्रीचे काम केले. हलबांनी सूत विणकाम केले म्हणून बोगस होते काय? हलबा हे व्यवसायाने कोष्टी असले तर बुरूड-बुरड हे गोंड नावाने जाती दाखले कसे घेतात.
प्रधान मांग हे गोंड कसे झाले? जात प्रमाणपत्र तपासणी समितीने प्रचंड भ्रष्टाचार करून बोगस लोकांना वैधता प्रमाणपत्र दिले. पुरावे न तपासता दाखले कसे दिले, याची चौकशी व्हावी अशी मागणी सरकारकडे आहे. भाजप सरकारने हलबांचा प्राचीन इतिहास मान्य करू, न्यायालयाचे आदेश मान्य करू, असे शिष्टमंडळाला सांगूनही आदेश काढला नाही. आदिम समाजातील हलबा, हलबी, माना, गोवारी, धोबा, ठाकूर, धनगर, कोळी यांना न्याय मिळावा म्हणून संविधान संरक्षणासाठी लाखो आदिम बांधव रस्त्यावर उतरतील, असेही आदिम नेत्या अॅड. नंदा पराते म्हणाल्या.
सदर दौºयात प्रकाश निमजे, रामेश्वर बुरडे, सचिन बोरीकर, लोकेश वट्टीघरे, दिवाकर बाजीराव, शकुंतला वट्टीधरे उपस्थित होते.