रस्त्याचे बांधकाम रखडले
By admin | Published: April 23, 2016 01:51 AM2016-04-23T01:51:04+5:302016-04-23T01:51:04+5:30
ग्राम डुंडा ते म्हसवानी हा सात किलोमीटर लांबीचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक निर्माण योजनेंतर्गत दुरूस्तीसाठी मंजुर झाला.
निधीचा अभाव : नागरिकांना वाहतुकीचा त्रास
पांढरी : ग्राम डुंडा ते म्हसवानी हा सात किलोमीटर लांबीचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक निर्माण योजनेंतर्गत दुरूस्तीसाठी मंजुर झाला. २९ सप्टेंबर २०१५ पर्यंत या रस्त्याचे बांधकाम करावयाचे होते. मात्र निधी अभावी अवधी संपूनही या रस्त्याचे बांधकाम रखडले असून नागरिकांना मात्र येथून वाहतूक करताना त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याच्या बांधकामाला ३० एप्रिल २०१४ रोजी मंजूरी मिळाली होती व २९ सप्टेंबर २०१५ पर्यंत काम पूर्ण करावयाचे होते. शासनाकडून काही प्रमाणात निधी मिळाल्यावर कंत्राटदाराने डुंडा ते म्हसवानी रस्त्यावर तुुटक-तुटक काम केल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे या कामामध्ये अभियंताचे दुर्लक्ष सुद्धा वाटत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची चौकशी करुन रस्ता लवकरात लवकर तयार होण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.
सध्या लग्न सभारंभ व अन्य कार्यक्रम असल्यामुळे अपघात कमी होणार असून नागरिकांनाही येथून प्रवास करताना त्रास होणार नाही अशी मागणी जनतेने केली आहे. (वार्ताहर)