रोजगार हमी योजनेचा रस्ता गेला चोरीला
By admin | Published: February 16, 2017 12:56 AM2017-02-16T00:56:37+5:302017-02-16T00:56:37+5:30
परसवाडा : येथील ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या व तयार करण्यात आलेला पांदन रस्ता
परसवाडा : येथील ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या व तयार करण्यात आलेला पांदन रस्ता १६० मीटर चोरीला जाण्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने गावात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सन २००९-१० मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्यावर मातीकाम, मुख्य काम करण्यात आले. २ किमी लांबीचा रस्त्यावर ५ लाख २१ हजार रुपये मंजूर करण्यात आले.
त्यापैकी ४ लाख ४१ हजार ५९० रु. खर्च करण्यात आले. रस्ता अंदाजपत्रकानुसार २० फुट रुंदीकरणाचा होता, पण काही दोन शेतकऱ्यांनी १६० मीटर रस्ता जेसीबी मशीन लावून त्या ठिकाणी बांधतलाव तयार केला. यात रस्ता गहाळ झाला.
सदर रस्त्याने दररोज अनेक शेतकरी येणे-जाणे करतात. रस्ता अरुंद झाल्याने बैलगाडी, ट्रॅक्टर जाता येत नाही. कधी दुर्घटना घडेल याचा नेम नाही व एक दोन वेळा घटना घडली. मात्र सुदैवाने कोणची प्राणहाणी झाली नाही.
याबद्दल तक्रार खंडविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी गोंदिया यांना करण्यात आली आहे.
ग्राम पंचायतीने पोलीस स्टेशन व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केली असून दखल घेतली नाही. (वार्ताहर)