ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:10 AM2017-08-11T01:10:15+5:302017-08-11T01:10:37+5:30

तालुक्यात गौण खनिजाचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे.

Road plight due to Overload traffic | ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा

ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा

Next
ठळक मुद्देअवैध वाहतूक : महसूल विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : तालुक्यात गौण खनिजाचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरातून रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
गौण खनिजातून दरवर्षी शासनाला कोट्यवधी महसूल मिळतो. मात्र स्थानिक महसूल विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाचा महसूल बुडत असल्याचे आहे. तालुक्यातील चुलबंद नदी, ससीकरण नाला व विविध घाटावरुन रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. पळसगाव घाट, राका, पिपरी, सौंदड या बंद घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. या घाटावरुन होणाºया अवैध वाहतुकीमुळे या परिसरातील मुख्य रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चुलबंद नदीतील ज्या क्षेत्राचा लिलाव करण्यात आला. तिथून रेतीचे उत्खनन न करता दुसºयाच ठिकाणाहून रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. या परिसरातील काही कंत्राटदार सरकारी जागेत डंपींग करीत असल्याची माहिती आहे. या घाटातून रेतीच्या ओव्हरलोड ट्रक व ट्रॅक्टरमुळे सौंदड, राका, पळसगाव व चिखली, कनेरी/राम, भद्दूटोला, फुटाळा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्ता खराब असल्याने या मार्गावरुन शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खराब झाल्याने या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. २१ जून रोजी पळसगाव येथील योगेश मेश्राम या विद्यार्थ्याचा अपघात झाला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत.
ही बाब महसूल विभागाच्या अधिकाºयांना देखील माहिती आहे. रेतीच्या अवैध उपशामुळे शेतकºयांचा नुकसान होत आहे. जिल्हाधिकाºयांनी सडक अर्जुनी तालुक्यात सुरू असलेल्या गौण खनिजाच्या अवैध उत्खननाकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Road plight due to Overload traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.