गोंडीटोला रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 08:59 PM2019-05-19T20:59:46+5:302019-05-19T21:00:44+5:30
परिसरातील गोंडीटोला रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत होत असून या रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून कसे-बसे काम करताना बघायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरी : परिसरातील गोंडीटोला रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत होत असून या रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून कसे-बसे काम करताना बघायला मिळत आहे.
हे काम मुख्य कंत्राटदाराने दुसऱ्या कंत्राटदाराला पेटीमध्ये दिल्यामुळे या ठिकाणी रेती व मुरूमाची रॉयल्टी काढली नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे या ठिकाणी रेती व मुरमाचा मोठ्या प्रमाणात ठग बघायला मिळते. या विषयाची तक्रार तहसील विभागाकडे देऊनही न साथी चौकशी झाल्याची दिसत नाही. अशाच प्रकारची तक्रार मुख्यमंत्री सडक योजना कार्यालयात दिली असता कामात कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आल्याचे दिसत नाही. यामुळे वेगवेगळ््या चर्चांना पेव फुटत आहे.
घोटी परिसरातील गोंडीटोला रस्त्याची मागणी कित्येक दिवसांची असून यंदा या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र काम योग्यरित्या होत नसल्याने कामाची चौकशी करून सुधारणा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.