रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:27 PM2018-12-20T22:27:11+5:302018-12-20T22:28:00+5:30
स्थानिक तिरोडा-गोरेगाव या रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र सदर काम सुरू असतानाच हा रस्ता उखडल्याने या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी (डाकराम) : स्थानिक तिरोडा-गोरेगाव या रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र सदर काम सुरू असतानाच हा रस्ता उखडल्याने या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
रस्ता बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडा अंतर्गत मेंढा ते बोदलकसा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम फारच मंद गतीने सुरू आहे. रस्त्याचे कामे सुरु असतानाच काही ठिकाणी गिट्टी निघाली आहे. मागील तीन ते चार वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.
त्यानंतर आता पुन्हा डांबरीकरण करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी उखडली असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.