पाण्याच्या टाकीत आढळले कुजलेले उंदीर व पाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:31+5:30
सदर पाण्याची टाकी महिन्यातून एकदा साफ केली जात असल्याची माहिती पाणी वाटप कर्मचारी विरेंद्र मेंढे यांनी दिली. गेल्या २० वर्षांपासून या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षापासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू झाल्याने या जुन्या पाणी पुरवठा योजनेकडे दुर्लक्ष झाले असून तरिही पाणी पुरवठा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणाºया टाकीत कुजलेले उंदीर व पाली आढळून आल्या आहेत. तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे हा प्रकार उघडकीस आला असून यातून ग्रामपंचायत किती बेजबाबदारपणे काम करीत आहे याची प्रचिती आली असून यामुळे मात्र गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वडेगाव ग्राम पंचायत अंतर्गत जनतेला जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून एका वॉर्डातील अंदाजे २०० नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा केला जातो त्या टाकीत शनिवारी (दि.९) सकाळी ७ वाजता काही नागरिकांनी बघितले असता ८ ते १० उंदीर व पाली मेलेल्या व अळी झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्याची माहिती गावचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती उपसभापती व आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून देण्यात आली.
सदर पाण्याची टाकी महिन्यातून एकदा साफ केली जात असल्याची माहिती पाणी वाटप कर्मचारी विरेंद्र मेंढे यांनी दिली. गेल्या २० वर्षांपासून या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षापासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू झाल्याने या जुन्या पाणी पुरवठा योजनेकडे दुर्लक्ष झाले असून तरिही पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे मात्र टाकीत उंदीर व पाली मरून त्यांना अळ््या लागल्या आहेत. त्या टाकीतील पाणी आजही वॉर्डातील लोक पिण्यासाठी वापरतात, हे विशेष.
मात्र टाकीत मेलेले उंदीर व पाली आढळल्याचे कळताच काही महिलांनी घरातील स्वयंपाक फेकून दिल्याची माहिती आहे. शुक्रवारी (दि.८) गावात मंडई असल्याने चाट विक्रेत्यांनी बहुतेक याच टाकीच्या पाण्याचा वापर केला. यामुळे मात्र जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या शेतीचा हंगाम असल्याने बहुतेक मजुरांनी शेतात जाताना पिण्याचे पाणीही या टाकीतून घेतले.
वेळीच हा पकार उघडकीस आला अन्यथा मेलेल्या उंदीर व पालीचे पाणी गावकऱ्यांना प्यावे लागले असते. विस्तार अधिकारी हे कधीच गावाला भेटी देत नाहीत, ते फक्त व्हिजीट बुक बोलावून व्हिजिट नोंद करीत असल्याचे गावकरी बोलत आहेत. अशात त्यांच्यावरही करावाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
वडेगाव येथे एक मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्या योजनेतून गावात पाणी पुरवठा केला जात आहे. जुनी टाकी कायमची बंद करण्याबाबत संबंधित पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला सूचना दिल्या होत्या. मात्र पाणी पुरवठा बंद न करता त्याने लोकांना पिण्यासाठी पाणी देणे सुरूच ठेवले आहे.
सरिता कटरे,
ग्राम सेविका, वडेगाव-सडक
--------------------
सदर प्रकरण पंचायत समितीच्या मासिक सभेत ठेऊन संबंधित कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करू.
राजेश कठाने
उपसभापती, पंचायत समिती, सडक-अर्जुनी