रोहयोची कामे यंत्रणांनी समन्वयातून करावी

By admin | Published: May 18, 2017 12:17 AM2017-05-18T00:17:18+5:302017-05-18T00:17:18+5:30

मजूरीनिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यात रोजगार हमी योजना यशस्वी ठरली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन

Roho's works should be done by coordinating the system | रोहयोची कामे यंत्रणांनी समन्वयातून करावी

रोहयोची कामे यंत्रणांनी समन्वयातून करावी

Next

राजकुमार बडोले : रोजगार हमी योजनेची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मजूरीनिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यात रोजगार हमी योजना यशस्वी ठरली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबत अनेक विकास कामे करण्याची क्षमता या योजनेत आहे. जिल्ह्यात या योजनेतून ग्रामविकास व वैयक्तीक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत सोमवारी (दि.१५) ते बोलत होते. सभेला आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, रोहयो अंतर्गत कामाचे नियोजन मोठ्या प्रमाणात दिसते, परंतु प्रत्यक्षात कामे कमी करण्यात येतात. प्रत्यक्षात जी कामे रोहयो अंतर्गत करायला पाहिजे ती होत नाही. तलावातील गाळ काढण्याचे नियोजन देखील रोजगार हमी योजनेतून करण्यात यावे. जी कामे आपण करणार आहोत ती दिर्घकाल टिकाऊ स्वरुपाची राहतील यासाठी चांगल्या प्रकारचे अंदाजपत्रक तयार करावे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतातील उत्पादित माल घरी किंवा बाजारपेठेत पोहचविण्यासाठी चांगल्या प्रकारचे पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात तयार करावेत असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे यांनी, रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात येतील. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरुम टाकण्यात येईल, त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल. १०० दिवस जिल्ह्यातील मजूरांना रोजगार कसा मिळेल याचे नियोजन रोहयो विभागाने करावे. ग्रामरोजगार सेवकांना कामाच्या जबाबदाऱ्या देवून कामे करु न घेण्यात येतील. तालुक्याचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी एकत्र बसून करावे, असे त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी, कुशल कामाचे मागील वर्षीचे १६ कोटी रु पये शासनाकडे थकीत आहे, ते त्वरीत मिळाल्यास संबंधितांना देता येईल. १२ मे पर्यंत ग्रामपंचायत अंतर्गत जिल्ह्यात ८४५ कामे सुरु असून यावर ५३ हजार २६२ मजूरांची उपस्थिती होती. तर यंत्रणांची ३४४ कामे सुरु असून यावर १६ हजार १७३ मजूरांची उपस्थिती असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच रोहयोची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Roho's works should be done by coordinating the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.