गिधाडी येथे रोहयोत भ्रष्टाचार

By admin | Published: July 2, 2016 02:02 AM2016-07-02T02:02:09+5:302016-07-02T02:02:09+5:30

गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गिधाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात

Rohtut Corruption at Gadhadi | गिधाडी येथे रोहयोत भ्रष्टाचार

गिधाडी येथे रोहयोत भ्रष्टाचार

Next

ग्रा.पं. सदस्यांचा आरोप : खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन
गोंदिया : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गिधाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सचिन नांदगाये यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी खंडविकास अधिकारी यांना निवदेन दिले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिधाडी येथे मागील सहा महिन्यापूर्वी अकुशलमध्ये प्रेमलाल ठाकरे ते भागवत रहांगडाले यांच्या शेतातपर्यंत ५५० मीटर पांदन रस्ता व मागील दोन वर्षांपूर्वी अकुशलमध्ये भास्कर पटले ते छगनलाल जयतवार यांच्या शेतापर्यंत ७५० मीटर पांदन रस्ता बनविण्यात आला होता. सदर दोन्ही पांदन रस्त्यांवर सन २०१६-१७ मध्ये मागील २० दिवसांपूर्वी ५५० मीटर लांब असलेल्या पांदन रस्त्याचे १२८ ब्रॉस मुरूम अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आले. तसेच दुसऱ्या ७५० मीटर पांदन रस्त्यावर १४५ ब्रॉस मुरूम अंदाजपत्रकात समाविष्ट असून १२८ ब्रॉस व १४५ ब्रॉस मुरूमाची लीज ग्रामपंचायतद्वारे काढण्यात आली.
सदर कामात नियमाप्रमाणे मजुरांना काम मिळण्याच्या दृष्टीने मजुरांच्या हातून खोदकाम करणे गरजेचे होते. तशी अंदाजपत्रकात तरतूदसुद्धा आहे. परंतु सरपं रेखा संजय मेश्राम, सचिव मनिष यू. खाडे, कंत्राटी अभियंता व ग्रामरोजगार सेवक नरेंद्र रहांगडाले यांनी नियमांना धाब्यावर ठेवून स्वत:च्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करण्याच्या दृष्टीने दोन्ही पांदन रस्त्याच्या मुरूम खोदाईचे काम जेसीबीद्वारे करण्यात आले. त्यामुळे गावातील अनेक मजूर सदर योजनेच्या कामापासून वंचित ठरले आहेत.
तसेच सदर ५५० मीटर पांदन रस्त्यावर १२८ ब्रॉस मुरूम घालणे आवश्यक होते. परंतु केवळ ७८ ब्रॉस मुरूम टाकून पसरविण्यात आले. तर ७५० मीटर असलेल्या पांदन रस्त्यावर १४५ ब्रॉस मुरूम टाकणे गरजेचे असताना फक्त ९५ ब्रॉस मुरूम टाकून तात्काळ पसरविण्यात आले. यात सदर पदाधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार करण्याच्या दृष्टीने संगनमत केले होते.
सदर कामे संबंधित अभियंता यांच्या देखरेखीत करणे गरजेचे होते. परंतु कंत्राटी अभियंता ५५० मीटर पांदन रस्त्यावर एकही दिवस आले नाही. दुसऱ्या थछ० मीटर पांदन रस्त्यावर एक दिवस भेट दिली. सदर दोन्ही रस्त्यांवर मुरूम पसरविण्याचे काम मजुरांना रोजंदारीने देणे आवश्यक होते. परंतु प्रति ब्रॉस ६० रूपये प्रमाणे ठेक्यामध्ये केवळ आठ ते १० मजुरांना देण्यात आले.
या प्रकारामुळे सरपंच रेखा संजय मेश्राम, सचिव मनिष यू. खाडे, कंत्राटी अभियंता, रोजगारे सेवक नरेंद्र रहांगडाले यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट आहे.

Web Title: Rohtut Corruption at Gadhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.