८५ हजार कुटुंबांना रोहयोचा आधार

By admin | Published: February 20, 2016 02:33 AM2016-02-20T02:33:36+5:302016-02-20T02:33:36+5:30

पावसाने पाठ फिरविल्याने शेतात कामे नाहीत. रबी हंगामासाठी पाण्याची सोय नाही. त्यामुळे मजुरांच्या हातांना शेतीचे काम नाही.

ROHYO basis for 85 thousand families | ८५ हजार कुटुंबांना रोहयोचा आधार

८५ हजार कुटुंबांना रोहयोचा आधार

Next

गोंदिया: पावसाने पाठ फिरविल्याने शेतात कामे नाहीत. रबी हंगामासाठी पाण्याची सोय नाही. त्यामुळे मजुरांच्या हातांना शेतीचे काम नाही. अशा परिस्थितीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील मजुरांसाठी मोठा आधारवड ठरली. कामाच्या शोधात इतर भागात भटकंतीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांना आपल्याच गावाजवळ काम उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेमुळे जिल्ह्यात ८५ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले.
एरवी गावाकडे कामे नसली की गावातील मजूर गाव सोडून शहरामध्ये येतात. अशावेळी त्यांना गाव व परिसरात रोजगार उपलब्ध करु न देवून मजूरांचे स्थलांतर थांबविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश साध्य करीत असताना गावांमध्ये मजुरांना काम व रोजगार उपलब्ध होत आहे. पर्यायाने गावाचा विकासही साधला जात आहे. ही योजना ग्रामीण विकासाची व रोजगार निर्मिती करण्यासाठी आधारवड ठरली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही मजुरांना रोजगाराची हमी तर देतेच तसेच गावात पायाभूत सुविधांचा विकासही करण्यात महत्वाची ठरत आहे. योजनेतून झालेल्या कामांमुळे गाव स्वयंपूर्ण व स्वावलंबी होण्यास मदत होत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १७ फेब्रुवारी २०१६ पर्यंत एकूण ९३ कोटी ६९ लाख ३४ हजार रु पये निधी खर्च करण्यात आला आहे. त्यावर ४५ लाख ५६ हजार ३१४ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झाली आहे. त्यामधून ८५ हजार ७०० कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला असून त्यापैकी ११ हजार २५६ कुटूंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करु न देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हयातील अनेक मजूर कुटूंबांचे रोजगारानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्यास यश आले.
सन २०१५-१६ या वर्षात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यंवंशी यांच्या विकासात्मक दृष्टीकोनातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली १०० माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरण व दुरुस्ती तसेच तलावांमध्ये मत्स्यसंवर्धन करुन मत्स्यव्यवसायाला चालना देणे तसेच वैयक्तिक लाभामध्ये पशुपालन गोठा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनेला आपलेसे केले असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद देत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

योजनेंतर्गत झाली ही कामे
या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीची मोठया प्रमाणात विकासाची कामे करण्यात येत आहे. मातीबांध, पांदण रस्ते, सिंचन विहीरी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, भात खाचर तयार करणे, शौचालय, नाला सरळीकरण, सिमेंट नाला बांध, तलाव गाळ काढणे, खोलीकरण, शेततळे, वनतळी, मैदान सपाटीकरण करणे अशा प्रकारची असंख्य कामे करण्यात येत आहे. योजनेच्या काटेकोर, नियोजनबध्द व प्रभावी अंमलबजाणीमुळे मजुरांच्या हाताला काम व गावाचा पायाभूत सुविधेसह विकास करण्यास ही योजना महत्वाची ठरली आहे.

Web Title: ROHYO basis for 85 thousand families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.