पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:46 AM2017-08-10T01:46:40+5:302017-08-10T01:47:10+5:30
मागील पंधरा दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी देखील संपल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंडीकोटा : मागील पंधरा दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी देखील संपल्याचे चित्र आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात रोवणीची कामे अर्धवटच आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
यंदा पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामुळे पेरणीची कामे उशीरा झाली. पेरणीनुसार रोवणीची कामे जुलै अखेर संपणे अपेक्षित होते. परंतु आॅगस्ट महिना सुरू होऊनही रोवणीची कामे आटोपली नाहीत. अनेक शेतकºयांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी सर्व पिकांच्या पेरणी करीत भात रोवणीसाठी पºहे सुद्धा टाकले होते. त्यानुसार नर्सरीला एक ते सव्वा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सामान्यत: २० ते २५ दिवसांची नर्सरी रोवणीसाठी उत्तम मानली जाते. उशीरा रोवणी केल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. सध्या वरथेंबी पावसावर शेतकरी अवलंबून आहेत. शेतात पाणी नसल्याने शेतकºयांनी रोवणीची कामे अर्ध्यावर आहेत.
जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे पीक समाधानकारक दिसत आहे. परंतु ज्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी पूर्ण केली, ते पºहे मरत आहेत. रोपवाटिका वाळत असल्याचे चित्र आहे.
उत्पादन होणार निम्म्यापेक्षा कमी
१५ आॅगस्टपर्यंत हलक्या धानाची मुदत असते. मात्र १५ आॅगस्टनंतर केलेल्या रोवणीचा लाभ शेतकºयांना मिळणार नाही. त्यामुळे पुढे पाऊस आला तरी धानाचे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी येईल, अशी शंका शेतकºयांंनी व्यक्त केली आहे. धान शेतात लावून अनेक शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पण पावसाचा पत्ताच नाहीत. जो दिवस उगवतो तो सारखाच असतो. त्यामुळे या वेळी शेतकºयांचे बेहाल होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
नदी-नाले कोरडेच
पावसाळा कोरडाच जात आहे. पावसाचे तीन ते चार नक्षत्र लोटूनही मुंडीकोटा परिसरात नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पंप धारकांनी पावसाची वाट न बघता पºहे लावले व रोवणीलाही सुरुवात केली. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेला शेतकरी पावसाची वाट पहात आहे. अनेक शेतकºयांचे लावलेले बियाणे वाया गेले. दुसरीकडे पंपधारकांनी जोमात पेरणीला सुरुवात केली. मात्र समाधानकारक पाऊस न पडल्याने विहीर, बोअरवेल, नदी, नाले कोरडे आहेत. कशीतरी पेरणी केली, परंतु रोवणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी निराश होत आहे. मात्र पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मात्र चिंतेमध्ये आहेत. या परिसरात बहुतांश रोवण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या पºहांना ४० ते ५० दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे ते रोवण्यायोग्य नाही. रोपे वाळत चालले असून जमिनीला भेगा पडत आहेत. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.