वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे १.२८ लाख रूपये वर्षभरापासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 05:00 AM2021-07-08T05:00:00+5:302021-07-08T05:00:13+5:30

वाहतूक अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियम तोडणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत कारवाया केल्या जात असून, यात अधिकांश प्रकरणांत दंडात्मक कारवाया केल्या जातात. जिल्ह्यात त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२१ मध्ये विविध प्रकारांत १३२०० दंडात्मक कारवाया केल्या आहेत. 

Rs 1.28 lakh has been spent on traffic offenders for over a year | वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे १.२८ लाख रूपये वर्षभरापासून थकले

वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे १.२८ लाख रूपये वर्षभरापासून थकले

Next
ठळक मुद्देसन २०२१ मध्ये ठोठावला २९ लाखांचा दंड : २८ लाखांचा दंड झाला वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, नियम तोडल्यास त्याचे परिणाम कधी-कधी अंगलट येतात. मात्र, याही पेक्षा दु:खाची बाब म्हणजे एखाद्या बेजबाबदार व्यक्तीच्या चुकीची शिक्षा निरपराध व्यक्तीला भोगावी लागते. वाहतूक अपघातांतील बहुतांश प्रकरणांतील हीच स्थिती असते. यामुळेच वाहतूक अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियम तोडणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत कारवाया केल्या जात असून, यात अधिकांश प्रकरणांत दंडात्मक कारवाया केल्या जातात. जिल्ह्यात त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२१ मध्ये विविध प्रकारांत १३२०० दंडात्मक कारवाया केल्या आहेत. 
यातील १२६७५ कारवायांतील २७ लाख ५६ हजार ०५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर ५२५ कारवायांतील एक लाख २८ हजार १०० रुपयांचा दंड अद्यापही संबंधितांवर थकून आहे. 

परवाना नसलेल्यांवरच सर्वाधिक कारवाया 
- सध्या विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच ट्यूशन क्लासेस सुरू होत असून, त्यांना दिवसभर धावपळ करावी लागते. अशात  पालक आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी वाहन खरेदी करून त्यांना देत आहेत. मात्र, हे करताना त्यांचा परवाना आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत.
- सध्या विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच ट्यूशन क्लासेस सुरू होत असून, त्यांना दिवसभर धावपळ करावी लागते. अशात  पालक आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी वाहन खरेदी करून त्यांना देत आहेत. मात्र, हे करताना त्यांचा परवाना आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत.
- परवाना नसल्यास वाहतूक पोलिसांकडून जास्तीत जास्त १०० रुपयांचे चलन होत असल्याचा समज आजही कित्येक नागरिकांत आहे. त्यामुळे परवाना काढण्याची भानगड पाळण्यापेक्षा १०० रुपये दिलेले बरे अशा तोऱ्यात ते वागतात.

लवकर दंड न भरल्यास...
- वाहतूक नियंत्रण शाखेने एखाद्या वाहनावर कारवाई केल्यानंतर त्याने दंडाची रक्कम कित्येक दिवस भरली नसली तरीही त्यावर व्याज लावता येत नही. आहे ती रक्कमच नियमानुसार घ्यावी लागते.
- एखाद्या व्यक्तीने दंडात्मक कारवाई झाल्यावर पैसे न भरल्यास वाहतूक नियंत्रण शाखा दंडाची रक्कम वाढवू शकत नाही. यामुळेही कित्येकांकडून दंड थकविला जातो.
- मात्र, दंडाची रक्कम थकवून असलेली व्यक्ती दुसऱ्यांदा वाहतूक पोलिसांच्या हाती लागल्यास त्याची माहिती मशीनद्वारे उपलब्ध होते व अशात वाहन जप्त केले जाते. जुनी रक्कम वसूल झाल्यावर ते वाहन सोडले जाते.

 

Web Title: Rs 1.28 lakh has been spent on traffic offenders for over a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.