२५१५ लेखाशिर्षाची १७ कोटी रुपयांची थकबाकी लवकरच ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:39 AM2021-02-27T04:39:13+5:302021-02-27T04:39:13+5:30
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी २५१५ लेखाशिर्षाअंतर्गत विविध कामे केली जातात. मात्र मागील चार वर्षांपासून १७ ...
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी २५१५ लेखाशिर्षाअंतर्गत विविध कामे केली जातात. मात्र मागील चार वर्षांपासून १७ कोटी रुपयांची रक्कम थकीत होती. यामुळे याचा कामांवरसुद्धा परिणाम झाला होता. ही बाब लक्षात घेत आ. विनोद अग्रवाल यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन थकीत निधी देण्याची मागणी केली. यावर ग्रामविकास मंत्र्यांनी १५ दिवसात ही रक्कम देण्याचे निर्देश दिले.
ग्रामविकास मंत्रालयातंर्गत लेखाशिर्ष २५१५ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतरही या कामांचे १७ कोटी रुपयांचे बिल अद्यापही काढण्यात आले नाही. बिल थकीत असल्याने संबंधित कंत्राटदारसुद्धा आर्थिक संकटात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांवर परिणाम होत असल्याची बाब आ. विनोद अग्रवाल यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. तसेच यामुळे कुठल्या अडचणी येतात त्या देखील त्यांच्यासमोर मांडल्या. याचीच दखल घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना १५ दिवसात थकीत १७ कोटी वितरीत करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.