ग्रामपंचायतच्या पथदिव्यांचे २३ कोटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:07+5:302021-06-26T04:21:07+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाइटसाठी विद्युत पुरवठ्याचे बिल जिल्हा परिषद या प्रमुख संस्थेच्या माध्यमातून भरले जाते, मात्र गोंदिया ...

Rs 23 crore spent on Gram Panchayat street lights | ग्रामपंचायतच्या पथदिव्यांचे २३ कोटी रुपये थकले

ग्रामपंचायतच्या पथदिव्यांचे २३ कोटी रुपये थकले

Next

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाइटसाठी विद्युत पुरवठ्याचे बिल जिल्हा परिषद या प्रमुख संस्थेच्या माध्यमातून भरले जाते, मात्र गोंदिया जिल्हा परिषदेकडून गेल्या अनेक वर्षांपासून स्ट्रीट लाइटचे बिल भरण्यात आलेले नाही. यामुळे गोंदिया व देवरी या दोन उपविभागांत येणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाइट पुरवठ्याचे जवळपास २३ कोटींचे बिल थकीत पडले आहे. यामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावे अंधाराच्या विळख्यात सापडली आहेत.

या प्रकारामुळे ग्रा.पं. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. एवढेच नव्हे तर पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांचे दालन गाठून बिल भरणा करण्यासाठी निवेदन दिले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ८ तालुक्यांत ५४५ ग्रामपंचायती असून त्यामध्ये ९०० हून अधिक गावे व वाड्यांचा समावेश आहे. आजघडीला सर्वच ठिकाणी विद्युत वाहिन्या पोहोचला आहेत. यामुळे रात्री गावात प्रकाश राहावा, या अनुषंगाने रस्त्यावर स्ट्रीट लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्रीट लाइटसाठी पुरविण्यात येणाऱ्या वीज बिलाचा भरणा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेकडून वीज बिलाचा भरणा करण्यात आला नाही. यामुळे लॉकडाऊन दरम्यान डबघाईस आलेल्या महावितरण कंपनीने थकीत ग्राहक तथा संस्थांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यानुरूप गोंदिया जिल्ह्यातील सर्वच गावांच्या स्ट्रीट लाइटचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने गावे अंधाराच्या विळख्यात सापडली आहेत.

Web Title: Rs 23 crore spent on Gram Panchayat street lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.