विद्यार्थ्यांची आरटी-पीसीआर चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:46+5:302021-03-21T04:27:46+5:30
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन मेश्राम तसेच शेंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश दोनोडे यांच्या मार्गदर्शनात ...
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन मेश्राम तसेच शेंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश दोनोडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.पी.मेश्राम यांच्या नियोजनानुसार एकूण ४०९ विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या ३४१ विद्यार्थ्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तर ६८ विद्यार्थ्यांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. याप्रसंगी डॉ. मेश्राम यांनी, शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयक काळजी घ्यावी असे सांगितले. तर मुख्याध्यापक मेश्राम यांनी, कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले. तसेच जिल्हा आरोग्य विभाग आणि तालुका आरोग्य विभागाचे विद्यार्थ्यांची कोवीड चाचणी केल्याबाबत आभार मानले.
चाचणीसाठी आरोग्य विभागाचे डॉ. दीपक उजवणे, डॉ.दीपा वंजारी, डॉ. कुमुदिनी हटवार, तंत्रज्ञ नंदकिशोर तरोणे, आरोग्य सेविका उषा जगताप, सुनंदा मानकर, पराग भगत, महेश भोवते, पुरुषोत्तम पातोडे, सुशिला बडोले, शिक्षक एस. सी. फुंडे, डी. पी. डोंगरावर, डब्लू.एम. परशुरामकर, पी. सी. येळेकर, आर. जी. पुस्तोडे, जी. बी. डोंगरावर, व्ही. पी. आगाशे, सी. एम. भीवगडे, आय. वाय. रहांगडाले, एन. आर. गिरेपुंजे, यू. आय. खुटमोडे, आय. वाय. रहांगडाले, के. पी. हुकरे, जे. पी. नंदेश्वर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.