ओटीपीच्या तांत्रिक अडचणींमुळे आरटीई प्रवेशाला ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:30 AM2021-03-23T04:30:53+5:302021-03-23T04:30:53+5:30

गोंदिया : बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम, विना अनुदानित ...

RTE admission extended till March 30 due to technical difficulties of OTP | ओटीपीच्या तांत्रिक अडचणींमुळे आरटीई प्रवेशाला ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

ओटीपीच्या तांत्रिक अडचणींमुळे आरटीई प्रवेशाला ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

Next

गोंदिया : बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम, विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. ३ ते २१ मार्च २०२१ या कालावधीत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली. परंतु या काळात ओटीपीची तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे येथील शिक्षक संचालकांनी सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील १४६ शाळांमध्ये ९७६ मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. १ ऑक्टोबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधी दरम्यान जन्मलेली बालके ऑनलाईन प्रवेश नोंदणीकरिता पात्र राहणार आहेत. तालुक्याच्या गटसाधन केंद्रस्थळी मदत व तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले आहेत. आमगाव तालुक्यातील १२ शाळांत ८३ जागा,अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांत १०० जागा, देवरी तालुक्यातील १० शाळांत ४४ जागा, गोंदिया तालुक्यातील ५८ शाळांत ३४९ जागा, गोरेगाव तालुक्यातील १५ शाळांत ७९ जागा, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० शाळांत ४१ जागा, सालेकसा तालुक्यातील ७ शाळांत ४७ जागा, तिरोडा तालुक्यातील २१ शाळांत १३३ जागा आहेत. सुरूवातीला ३ ते २१ मार्च दरम्यान आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची वेळ देण्यात आली होती. परंतु ११ ते १५ मार्च या काळात ओटीपीची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन करता आले नाही. परिणामी आरटीई प्रवेशाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी करावी असे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, संगणक प्रोग्रामर नितेश खंडेलवाल, मनोजकुमार शेणमारे यांनी कळविले आहे.

बॉक्स

ही लागणार कागदपत्रे

जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा सर्व घटकांना आवश्यक, सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला अनिवार्य, आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचा १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग विद्यार्थ्याकरिता ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र, पाल्य व पालक यांचे आधारकार्ड जमा करावे.

Web Title: RTE admission extended till March 30 due to technical difficulties of OTP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.