आरटीई प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल; राज्यभरातील ६६ टक्के मुलांचे प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 01:20 AM2019-05-14T01:20:04+5:302019-05-14T01:20:16+5:30

आरटीई प्रवेशाची पहिली फेरी पार पडली असून गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गोंदियामधील ७८.९८ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.

RTE entry in Gondia district tops in state; The admission of 66% of the children in the state | आरटीई प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल; राज्यभरातील ६६ टक्के मुलांचे प्रवेश निश्चित

आरटीई प्रवेशात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल; राज्यभरातील ६६ टक्के मुलांचे प्रवेश निश्चित

googlenewsNext

गोंदिया : आरटीई प्रवेशाची पहिली फेरी पार पडली असून गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गोंदियामधील ७८.९८ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.
राज्यातील ३५ जिल्ह्यातील ९ हजार १९५ शाळांमध्ये एक लाख १६ हजार ७७९ जागा आरटीईसाठी राखीव करण्यात आल्या आहे. या जागांसाठी दोन लाख, ४४ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या सोडतीनंतर ४४ हजार, ९८३ विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी प्रवेश घेतले.
गोंदिया जिल्ह्याच्या १४१ शाळांमध्ये १०४३ जागांसाठी प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी २ हजार ७३१ अर्ज आले. यातील ६०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्या पाठोपाठ पालघर ७५.७७ टक्के धुळे ७४.९४, सोलापूर ७४.८६, सातारा ७३.६३, वर्धा ७२.९०, अहमदनगर ७२.६२, अकोला ७२.४९, भंडारा ६९.७५, बुलढाणा ६९.४८, मुंबई ६९.०४, नाशिक ६८.९२, पुणे ६८.६४, जलगाव ६८.५४, रायगड ६८.३६, अमरावती ६७.५२, नांदेड ६७.०५, जालना ६६.८०, बिड ६६.७३, ठाणे ६५.३५, नागपूर ६५.१५, चंद्रपूर ६४.०४, रत्नागिरी ६३.३३, लातूर ६३.१८, औरंगाबाद ६१.४७, उस्मानाबाद ६१.१५, यवतमाळ ६०.७३, वाशिम ६०.०४, मुंबई ५९.३४, परभणी ५९.०९, गडचिरोली ५८.६३, सिंधुदुर्ग ५६.३८, नंदूरबार ५५.७१, हिंगोली ५४.४६, कोल्हापूर ५० आणि सांगली जिल्ह्यात ४५.४२ टक्के बालकांनी आतापर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेश घेतले आहेत.

६६.४४ टक्के प्रवेश
पहिल्या फेरीत राज्यातील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. परंतु त्यातील ४४ हजार ९८३ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत झाला आहे. राज्यातील ६६.४४ टक्के बालकांचे प्रवेश झाले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

Web Title: RTE entry in Gondia district tops in state; The admission of 66% of the children in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.