ग्रामीण भागात अजूनही देशी खेळांची भुरळ

By Admin | Published: August 2, 2015 01:58 AM2015-08-02T01:58:25+5:302015-08-02T01:58:25+5:30

उन्हाळा संपला पावसाळा आला म्हणून ऋतूचक्र बदलले, पावसाळा येताच बालगोपाल शालेय मुले-मुली खूप आनंदी होतात.

In rural areas still the indulgence of indigenous sports | ग्रामीण भागात अजूनही देशी खेळांची भुरळ

ग्रामीण भागात अजूनही देशी खेळांची भुरळ

googlenewsNext

बाराभाटी : उन्हाळा संपला पावसाळा आला म्हणून ऋतूचक्र बदलले, पावसाळा येताच बालगोपाल शालेय मुले-मुली खूप आनंदी होतात. पावसात खेळाचे, नाचायचे आणि ओलेचिंब होवून घरी परतायचे असा स्थायी स्वभावच बनतो आणि सुटी असताना दिवसभर अनेक गावरान खेळ खेळून ही मुले देशी खेळांची परंपरा कायम टिकवून ठेवताना दिसत आहेत.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यामध्ये अनेक खेड्यापाड्यामध्ये मुले हे लंगडी, आट्या-पाट्या, विटी-दांडू, कबड्डी, लपाछपी, कंच्या गोळी, भंड, बद्दी, ढकण भांडी, टोंगरागोळी, बोदामार, लांब उडी, रस्सी खेच, डीवरडी, सडी असे अनेक देशी खेळ हे नेमके पावसाळा या ऋतूमानात आजही ग्रामीणातील बालगोपाल खेळतात. हे खेळ म्हणजे ग्रामीण भागातील मुलांच्या मनोरंजनाचे साधन. खेडी म्हटले तर अभ्यासवृत्ती ही फारशी दिसत नाही. खेळाच्या प्रमाणावर विशेष लक्ष आकर्षीत असतांना खेड्यामध्ये बरेचदा आढळतो. याचत देशी खेळांची जी परंपरा आहे ही काही प्रमाणात आहे असे म्हणावे लागते.
आपल्या परिसरात अनेक प्रकारचे उपक्रम मनोरंजनातून प्रबोधनाचे कार्य केले जाते.
त्यामध्येच हे देशी खेळांची एक मुहूर्त असेल असे वर्तीत करून जास्तीत जास्त देशी खेळ हे पावसाळा या ऋतूमध्ये खेळले जातात, हे मात्र खरे आहे. कारण पावसाळा लागून एक दिड महिन्याच्या कालावधी होताच देशी खेळांना भरगच्च उधान आल्याचे चित्र ग्रामीण भागातील बालगोपालकांनी हे दाखवून दिले आहे. म्हणून देशी खेळांची परंपरा ही आजही कायम स्वरूपी परंपरा दिसत आहे. (वार्ताहर)

Web Title: In rural areas still the indulgence of indigenous sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.