तेंदुपत्ता संकलनातून ग्रामीण मिळतोय रोजगार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:50+5:302021-05-19T04:30:50+5:30

सिरपुरबांध : कोरोनाला आळा घालण्याकरिता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सर्वत्र सर्व व्यापार, रोजगार ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. ...

Rural Employment through Tendupatta Collection () | तेंदुपत्ता संकलनातून ग्रामीण मिळतोय रोजगार ()

तेंदुपत्ता संकलनातून ग्रामीण मिळतोय रोजगार ()

Next

सिरपुरबांध : कोरोनाला आळा घालण्याकरिता ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सर्वत्र सर्व व्यापार, रोजगार ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. अशात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामीण जनतेला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील जनतेला पूरक काहीच व्यवसाय नसल्याने जगावे कसे असा प्रश्न पडला होता. त्यात तेंदुपत्ता संकलन सुरू झाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.

सध्या ग्रामीण परिसरात गौण वनोउपजातून ग्रामीण जनतेला रोजगार मिळत आहे. देवरी तालुक्यातील काही गावांमधून ग्रामसभांच्या माध्यमातून तेंदुपत्ता संकलन सुरू असल्याने ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध झाला आहे. यावर्षी तेंदुपत्याला दरसुद्धा चांगला मिळत असल्यामुळे ग्रामीण जनता तेंदुपत्ता गोळा करण्याकरिता पहाटेपासूनच मजूरवर्ग जंगलात जात आहेत. घरी तेंदुपानांचे पुडे तयार करून फडीवर घेऊन जात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. ग्रामीण जनतेला रोजगार मिळाल्याने समाधान व्यक्त करत आहेत. सामुहिक वनहक्क प्राप्त गावे आपल्या अधिकाराचा वापर करून ग्रामसभांच्या माध्यमातून तेंदु प्रक्रिया राबवून गावातील लोकांना अधिकाधिक दर आणि अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे तेंदुपत्या संकलनातून रोेजगाराच्या संधी निर्माण होत आहे. देवरी तालुका जंगलव्याप्त असल्याने प्रत्येक गावात तेंदुपत्ता संकलनाचे काम होत असते. त्यामुळे बऱ्याच गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होत असते. सध्या लॉकडाऊन असल्याने गावातच रोजगार प्राप्त झाल्यामुळे ग्रामीण जनता समाधान व्यक्त करत आहेत.

Web Title: Rural Employment through Tendupatta Collection ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.