ग्रामीण रु ग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:51 PM2018-10-11T22:51:13+5:302018-10-11T22:51:39+5:30

येथील ग्रामीण रु ग्णालय कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अकरा महिन्याचा करारनामा १६ सप्टेबरला संपला. त्यामुळे या ठिकाणी नवे वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्ती आदेश काढला.

Rural Routine Without the Medical Officer | ग्रामीण रु ग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना

ग्रामीण रु ग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना

googlenewsNext
ठळक मुद्देडिएचओच्या आदेशाला खो : वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रूजू होण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील ग्रामीण रु ग्णालय कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अकरा महिन्याचा करारनामा १६ सप्टेबरला संपला. त्यामुळे या ठिकाणी नवे वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्ती आदेश काढला. मात्र त्यांनी येथील रुग्णालयात रूजू होण्यास नकार दिल्याची माहिती आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी ग्रामीण रुग्णालय आॅक्सीजनवर सुरू आहे. रुग्णांची तपासणी,औषोधोपचार, महत्वाचे शासकीय कामाचे पत्रव्यवहार, कर्मचाºयाचे वेतन, वैद्यकीय प्रमाणपत्र, नवीन औषध खरेदीसह इतर कामे रखडली आहेत. प्राप्त माहितीनुसार गोरेगाव ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते यांनी आकास्मिक विभागमध्ये कार्यरत एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश काढले. मात्र आक्समिक विभागात डॉक्टरांची पदे आधीच रिक्त असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यानंतर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. मात्र त्यांनी सुध्दा येथे रूजू होण्यास नकार दिला. परिणामी येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार वाºयावर सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन करने बंद आहे. परिणामी पंधरा किलोमीटर अंतरावरावर गोंदिया येथे जावे लागत आहे. त्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे राष्ट्रीय बाल आरोग्य पथकाच्या डॉक्टरांना या ग्रामीण रुग्णालयाच्या कारभार सांभाळण्याची जवाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांना ओपीडी सांभाळावी लागत असल्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यास अडचण निर्माण होत आहे. तर गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घेण्याची वेळ आली आहे.
लाभार्थी अडचणीत
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रावर व कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यावी लागते. मात्र वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने त्यांना विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.
शस्त्रक्रियेसाठी रेफर टू गोंदिया
येथील वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्रसूतीकरिता येणाऱ्या गर्भवती महिलांना गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात रेफर केले जात आहे. तर रुग्णालयात पुरेसा औषधसाठा सुध्दा नसल्याने रुग्णांना बाहेरुन औषधी खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.

Web Title: Rural Routine Without the Medical Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.