ग्रामीण महिलांना आजही भाजी भुरक्याचा मोह

By Admin | Published: January 12, 2016 01:40 AM2016-01-12T01:40:10+5:302016-01-12T01:40:10+5:30

हजारो वर्षांपासून आजही कित्येक श्रीमंत-गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या घरी थंडीच्या दिवसात लाखोरीच्या ,...

Rural women still get the illusion | ग्रामीण महिलांना आजही भाजी भुरक्याचा मोह

ग्रामीण महिलांना आजही भाजी भुरक्याचा मोह

googlenewsNext

कुकसा भाजी : लाखोरीच्या भाजीपासून तयार भुरक्याला पसंती
बाराभाटी : हजारो वर्षांपासून आजही कित्येक श्रीमंत-गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या घरी थंडीच्या दिवसात लाखोरीच्या हिरव्या भाजीपासून तयार करण्यात येणारा खास भाजीभुरका ग्रामीण भागातील महिलांचा आवडीचा आहे. जेवणासाठी भाजी म्हणून वापरण्यात येणाऱ्या भाजी-भुरक्याचा मोह परंपरेने आजही मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र आजही ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.
गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. येथे निसर्ग सौंदर्याने आच्छादित व वनराईने आल्हादकारक असणारा जंगल परिसर आहे. येथील पाण्याने ग्रामीण शेती पिकते. त्याच शेतीमध्ये धान, ऊस, हरभरा, गहू, उळद, मूग तसेच लाखोरी डाळीचे उत्पन्न घेतले जाते. शेतामध्ये हिरवीगार दिसणारी लाखोरी भाजी तोडून ग्रामीण महिला तोडून घरी आणतात.
यानंतर तिला वाळवून त्यापासून भुरका तयार करतात. हा भाजी-भुरका भोजनात आहाराकरिता वापरला जातो. यालाच ग्रामीण भागातील महिला आपल्या बोलीभाषेमध्ये कुकसाभाजी असा शब्द वापरतात. या भाजी भुरक्याला अनेक अधिकारी खाण्यासाठी भरभरून पसंती करतात. प्रथम श्रेणीपासून तर चतुर्थ श्रेणीपर्यंत सर्वच पसंती देतात.
लाखोरी भाजीपासून तयार केलेला हा भुरका दिसायला गुराढोरांचे खाद्य कुकुस याप्रमाणे दिसते. त्यामुळे त्याला कुकसाभाजी असेसुद्धा संबोधले जाते. या भाजी भुरकाची खूप महती आहे. जरी शेतकरी वर्गाला तुरदाळ खायला मिळाली नाही तरी शेतकऱ्यांना जगण्यासाठी मात्र भाजी भुरका हमखास मिळतोच.
लाखोरीच्या डाळीपासून मिळणाऱ्या भुरक्याला खूप पसंती आहे. भाजी म्हणून त्याला उपयोग करून शेतकरी आपले समाधान करतात. तुरडाळीची वाढती महागाई पाहून तुरदाळ नापसंत केली जात आहे. गोरगरिबांना तुर डाळ खाणे आता परवडण्यासारखे नाही. तुर डाळ कधीकधी महिनाभर पुरविली जाते. त्यात तुर डाळीचे पाणी पौष्टीक असते. परंतु ग्रामीण भागात लाखोळीच्या भाजी भुरक्याला महत्व दिले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Rural women still get the illusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.