शेतकऱ्यांना सुरक्षित कीटकनाशक फवारणीचे प्रशिक्षण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:13+5:302021-08-29T04:28:13+5:30

जिल्ह्यात धान पिकाची रोवणी संपली असून, सध्या धान पिकावर खोडकीड, गादमाशी, करपा अशा रोग व किडींचा कमी जास्त प्रमाणात ...

Safe Pesticide Spray Training for Farmers () | शेतकऱ्यांना सुरक्षित कीटकनाशक फवारणीचे प्रशिक्षण ()

शेतकऱ्यांना सुरक्षित कीटकनाशक फवारणीचे प्रशिक्षण ()

Next

जिल्ह्यात धान पिकाची रोवणी संपली असून, सध्या धान पिकावर खोडकीड, गादमाशी, करपा अशा रोग व किडींचा कमी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोग व किडीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात पिकावर फवारणीची कामे सुरू केली आहेत. दरवर्षी कमी-जास्त प्रमाणात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होण्याच्या घटना होतात. अशात कृषी विभागाच्यावतीने सुरक्षित कीटकनाशक फवारणीचे प्रशिक्षण व जनजागृती मोहीम राबविली जात आहे. तालुका कृषी अधिकारी पी.आर.मेंढे, कृषी सहायक राजशेखर राणे, कृषी सहायक कार्यालय व्यवस्थापक शुभम मेश्राम यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले. प्रशिक्षणाला नीलेश देशमुख, देवेंद्र राणे, सरपंच श्याम चुटे, कृषी मित्र मोरेश्वर मेश्राम, रोजगार सेवक विश्वनाथ तरोने, मोहन तवाडे, नंदकिशोर राऊत, गणेश वट्टी, संतोष लांजेवार, नरेश जमदाळ, डोमाजी पटणे, रमेश ईळपाते, किशोर तरोने, गोपाल जमदाळ, योगेश्वर डोये व बाम्हणी क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Safe Pesticide Spray Training for Farmers ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.