किशोरवयीन मुलींशी साधले हितगूज
By admin | Published: December 27, 2015 02:16 AM2015-12-27T02:16:21+5:302015-12-27T02:16:21+5:30
किशोरवयीन मुलींशी छेडखानी होऊ नये यासाठी त्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पाजनकर : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
वडेगाव : किशोरवयीन मुलींशी छेडखानी होऊ नये यासाठी त्यांना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींना कायद्याचे ज्ञान देण्यासाठी तिरोडा न्यायालयातर्फे वडेगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांसंबंधी कायद्यांवर मार्गदर्शन मुख्य दिवानी न्यायाधीश पाजनकर यांनी केले.
महिला सशक्तीकरण व महिला कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथे शाळा समितीच्या अध्यक्षा सुनीता मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. मार्गदर्शक म्हणून मुख्य दिवानी न्यायाधीश पाजनकर, अॅड. यादव, प्रणय भांडारकर, प्राचार्य टी.टी. रहांगडाले उपस्थित होते. यावेळी यादव यांनी मुलींना कायद्याची माहिती दिली. अॅड. प्रणय भांडारकर यांनी ९ ते १२ वयोगटातील मुलींची रॅगिंग, मुलींची छेडखानी या संदर्भात माहिती देत कॉपीराईट अॅक्टची माहिती दिली. न्यायाधीश पाजनकर यांनी कायद्याविषयी सखोल माहिती देत हुंडाबळी व कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाची माहिती दिली. संचालन वाय. के. नागपुरे तर आभार बैगणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी आर.जी. पुस्तोडे, एच.पी. नागदेवे, एस.के. कांधे, वानखेडे, पारधी, एस.वाय. निपाने, संदीप शेंडे यानी सहकार्य केले. (वार्ताहर)