स्वच्छतेसंदर्भात संत गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:31 AM2021-02-24T04:31:29+5:302021-02-24T04:31:29+5:30

गोंदिया : स्वच्छते संदर्भात संत गाडगेबाबा यांनी केलेले कार्य चिरकाल टिकणारे आहे. त्या कार्याचा वसा पुढे घेत प्रत्येक ग्रामपंचायतींनी ...

Saint Gadge Baba's thoughts should be adopted regarding cleanliness | स्वच्छतेसंदर्भात संत गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारावे

स्वच्छतेसंदर्भात संत गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारावे

Next

गोंदिया : स्वच्छते संदर्भात संत गाडगेबाबा यांनी केलेले कार्य चिरकाल टिकणारे आहे. त्या कार्याचा वसा पुढे घेत प्रत्येक ग्रामपंचायतींनी स्वच्छतेसंदर्भात लोक चळवळ उभारून ते पुढे नेण्याचे कार्य करावे,असे आवाहन जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता एस.बी. राठोड यांनी केले.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा तपासणी कार्यक्रम अंतर्गत गोंदिया तालुक्यातील मजितपूर येथे आयोजित संत गाडगेबाबा यांच्या जयंती कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मजितपूरच्या सरपंच आंबेडारे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे भागचंद्र रहांगडाले, तृप्ती साकुरे, विस्तार अधिकारी पंचायत लंजे, केंद्रप्रमुख केदार गोटेफोडे, गटसमन्वयक करुणा डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी पाणी व स्वच्छते संदर्भात गावाची तपासणी करण्यात आली. संचालन व आभार ग्रामसेवक गिरेपुंजे यांनी मानले.

Web Title: Saint Gadge Baba's thoughts should be adopted regarding cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.