सखी मंच महिलांचं व्यासपीठ

By admin | Published: April 10, 2016 02:04 AM2016-04-10T02:04:27+5:302016-04-10T02:04:27+5:30

लोकमत द्वारा चालविण्यात येत असलेला सखी मंच उपक्रम महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांना संघटित करण्याच्या

Sakhi platform women's platform | सखी मंच महिलांचं व्यासपीठ

सखी मंच महिलांचं व्यासपीठ

Next

उषा मेंढे : सखी मंचचा पुरस्कार वितरण कार्यक्रम
साखरीटोला : लोकमत द्वारा चालविण्यात येत असलेला सखी मंच उपक्रम महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांना संघटित करण्याच्या दृष्टीने तसेच महिलांच्या सुप्त कला-गुणांना उत्तेजना देणारे एक प्रकारचा व्यासपीठ असून सखी मंचच्या माध्यमातून महिलांमध्ये परस्पर सामंजस्य निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका करीत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात सखी मंचच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य लता दोनोडे, सरपंच संगीता कुसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.डी. चाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा देशमुख, ज्योती वानखेडे, अर्चना चाटे, मुक्ता कळंबे, माधुरी टेंभुर्णीकर उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक महिलांना सखी मंच सदस्य बनवून किचनसेटचे वाटप करण्यात आले. महिलांनी एकमेकांना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या. दरम्यान गीतगायन, प्रश्नमंजुषा व अन्य स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी जि.प. सदस्य दोनोडे यांनी, मोठ्या प्रमाणात महिलांनी सखी मंच सदस्य बनून विविध कार्यक्रमात सहभाग घ्यावा व आपल्या कला कुणांना उजाळा द्यावा, असे आवाहन केले. सरपंच कुसराम व डॉ. देशमुख यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. संचालन सागर काटेखाये यांनी केले. आभार रवी पडोळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नलू पडोळे, ए.ए. जोसेफ, गीता काटेखाये, उर्मिला बागडे, अनुसया बोहरे, संध्या मंडारे, लता गिरी, मोनाली गिल्ले, सविता गहाणे, हिरा गजभिये, प्रमिला दोनोडे, सुशीला बहेकार, सरोज मुनेश्वर यांनी सहकार्य केले.

Web Title: Sakhi platform women's platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.