जिल्ह्यातील ३११ विषय शिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:33 AM2021-09-12T04:33:50+5:302021-09-12T04:33:50+5:30
शिक्षकांना विषयानुसार विकल्प सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु काही शिक्षकांची सेवा ज्येष्ठता असतानाही विषय शिक्षक समान काम ...
शिक्षकांना विषयानुसार विकल्प सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु काही शिक्षकांची सेवा ज्येष्ठता असतानाही विषय शिक्षक समान काम समान वेतनवर नियुक्ती केली जात होती. यावर शिक्षकांनी आपली असहमती दर्शविली होती व परिणामी त्यांना वेतनश्रेणी किंवा कोणताही आर्थिक लाभ होत नव्हता. त्यांना विषय शिक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली होती. कालांतराने शासनाने आदेश पारित करून त्या आदेशात विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला. परंतु कोणत्या जिल्ह्यातील वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात खूप विलंब करण्यात आला.
यासंदर्भात शिक्षकांनी लढा देऊन ३११ शिक्षकांना प्रशासनाने वेतनश्रेणी मंजूर केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाकडून शिक्षकांच्या हितासाठी हा लढा दिला होता. ज्या शिक्षकांची विषय पदस्थापना करण्यात आली होती त्यांना वेतनश्रेणी मंजूर झाली नाही. अशात त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आपली लढाई सुरू ठेवणार आहे. तसेच २००८ मध्ये मुख्याध्यापक पद भरण्यात आले नसून केंद्रप्रमुख व विषय शिक्षकांच्या जागा रिक्त असलेल्या सर्व पदांवर पदोन्नती व पदस्थापना करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विरेंद्र कटरे, कार्याध्यक्ष हेमंत पटले, यू. पी. पारधी, सुधीर बाजपाई, यशोधरा सोनवणे, नागसेन भालेराव, केदार गोटेफोडे, विनोद लिचडे, अनिरुद्ध मेश्राम, नूतन बांगरे यांनी केली आहे.