रेशनचे धान्य विक्रीला; १० रुपयांत केली जाते विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:15+5:302021-09-14T04:34:15+5:30
गोंदिया : शासन दारिद्र्य रेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्न पुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री ...
गोंदिया : शासन दारिद्र्य रेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्न पुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री करीत असतात. काही लोक तांदूळ तर काही लोक गहू विक्री करीत असतात. गोंदिया जिल्ह्यात भात खाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. पोळीशिवाय राहणारे लाेक तांदळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे गहू शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ८ ते १० रुपये किलोने विक्री करतात. शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लोक तांदळाचा वापर करताना त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते; परंतु गहू मिळत असल्याने गव्हाचा वापर करीत नाहीत. गव्हाच्या ठिकाणी ते तांदळाचाच वापर करतात. त्यामुळे रेशन दुकानातून मिळालेले २ रुपये किलोचे गहू ८ ते १० रुपये किलोने शेजाऱ्या-पाजाऱ्यांना विकून त्या पैशातून तांदूळ घेत असतात. काही लोक गव्हाचा वापर करतात; परंतु ते तांदूळ दुसऱ्या लोकांना विक्री करतात. तीन रुपये किलोने मिळणारे तांदूळ १० रुपये किलोने विकून मिळालेल्या पैशातून गहू खरेदी करतात.
..............
३ रुपये किलो तांदूळ
अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना महिन्याकाठी ३५ किलो रेशन मिळते. २५ किलो तांदूळ व १० किलो गहू मिळत असते. तांदूळ तीन रुपये तर गहू दोन रुपये किलोने रेशन दुकानातून मिळत असते.
..........
हे घ्या पुरावे
तिरोडा
तिरोडा शहरासह ग्रामीण भागातील लोकांना मिळणारे रेशन लाभार्थी संपूर्ण न वापरता काही धान्य दुसऱ्यांना अधिक किमतीत विक्री करतो. त्यामुळे खरे लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत.
............
अर्जुनी-मोरगाव
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना हे अंत्योदय योजनेचा लाभ मिळत असल्याने ते शेतातील अन्न वापरतात आणि अंत्योदय योजनेचे रेशन दुसऱ्यांना कमी किमतीत विक्री करतात.
........
देवरी
देवरी तालुका आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने या तालुक्यात सर्वाधिक वापर तांदळाचा होताे. गव्हाचा वापर कमी प्रमणात होत असल्याने मिळणारे गहू हे अधिक किमतीत गव्हाची मागणी करणाऱ्यांना विकले जातात.
................