सालेकसा व सडक-अर्जुनीत बसस्थानक

By admin | Published: March 30, 2017 12:57 AM2017-03-30T00:57:54+5:302017-03-30T00:57:54+5:30

सालेकसा व सडक-अर्जुनी तालुका निर्मितीला ३० वर्षांचा काळ लोटत आहे, मात्र या दोन्ही तालुकास्थळी आतापर्यंत बसस्थानक उभारले नाहीत.

Salekasa and road-Arunit bus station | सालेकसा व सडक-अर्जुनीत बसस्थानक

सालेकसा व सडक-अर्जुनीत बसस्थानक

Next

३० वर्षानंतर होणार प्रवाशांची सोय : प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयात, जागा मिळताच कामाला सुरूवात
देवानंद शहारे  गोंदिया
सालेकसा व सडक-अर्जुनी तालुका निर्मितीला ३० वर्षांचा काळ लोटत आहे, मात्र या दोन्ही तालुकास्थळी आतापर्यंत बसस्थानक उभारले नाहीत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस राज्य मार्गावरच थांबतात व पुढे निघून जातात. मात्र आता प्रवाशांचे हे हाल दूर होणार आहेत. जागेचा प्रश्न सुटताच सदर दोन्ही तालुकास्थळी बसस्थानकांची उभारणी होणार आहे.
सडक-अर्जुनी व सालेकसा गावांना तालुका बनण्यास ३० वर्षांपेक्षा अधिक कालखंड लोटला. परंतु आतासुद्धा या दोन्ही तालुका मुख्यालयांना बसस्थानक मिळू शकले नाही. बसस्थानक बनविण्याचे प्रयत्न सदर दोन्ही ठिकाणी करण्यात आले. परंतु त्यात यश आले नाही. बसस्थानकांसाठी जागा उपलब्ध न होणे हीच या मार्गातील सर्वात मोठी समस्या बनली होती. मात्र आता सडक-अर्जुनी येथे नगर पंचायतच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तेथे लवकरच बस स्थानकाची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपूर्वी सडक-अर्जुनी नगर पंचायतच्या अध्यक्ष रीता अजय लांजेवार यांनी एक प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावात लांजेवार यांनी बस स्थानकासाठी आवश्यक जागा नगर पंचायतच्या वतीने उपलब्ध करवून देण्याची तयारी दाखविली. तसेच सालेकसा येथील एका युवकाने आपल्या मालकीची जागा बस स्थानकासाठी देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव तयार करून राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत. आता याबाबत निर्णय मुंबई कार्यालयाद्वारे घेण्यात येणार आहे. हा निर्णय कधी घेण्यात येईल याची आतुरता दोन्ही तालुक्यातील नागरिकांना लागली आहे. माहितीनुसार त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळ सकारात्मकच निर्णय घेईल, असे समजले जात आहे. जर असे झाले तर सडक-अर्जुनी व सालेकसा या दोन्ही ठिकाणी बस स्थानकांची सुविधा उपलब्ध होवू शकेल. यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दोन्ही तालुका मुख्यालयात बस स्थानक बनल्यास तेथील नागरिकांना मोठाच दिलासा मिळेल.

 

 

Web Title: Salekasa and road-Arunit bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.