सालेकसा नगर पंचायत निवडणूक अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:25 PM2017-11-29T22:25:49+5:302017-11-29T22:26:52+5:30

आमगाव खुर्द ग्राम पंचायतला नगर पंचायत सालेकसा मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे आमगाव खुर्दवासीयांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली.

Salekasa Nagar Panchayat elections are inescapable | सालेकसा नगर पंचायत निवडणूक अटळ

सालेकसा नगर पंचायत निवडणूक अटळ

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली : १३ डिसेंबरला होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आमगाव खुर्द ग्राम पंचायतला नगर पंचायत सालेकसा मध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे आमगाव खुर्दवासीयांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली. आमगाव खुर्दला समावेश केल्याशिवाय सालेकसा नगर पंचायतची निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली. त्याची बुधवारी (दि.२९) रोजी न्यायालयात सुनावणी होती. परंतु न्यायालयाने सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. परिणाम सालेकसा नगर पंचायतची निवडणूक १३ डिसेंबरला होणे अटळ आहे.
२८ नोव्हेंबरला आमगाव नगर परिषदेचा निकाल देताना उच्च न्यायालयाने आमगाव नगर परिषदेची अधिसूचना तुर्त रद्द केली. त्या पाठोपाठ आज बुधवारी सालेकसा नगर पंचायतमध्ये आमगाव खुर्दला समाविष्ट करण्याच्या निणर्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात सुनावणी होती. तो निकाल कुणाच्या बाजूने लागतो याची उत्सूकता होती. यासाठी उमेदवारांनी आपला प्रचार व संपर्क अभियान सुद्धा रोखून धरला होता. परंतु आता न्यायालयाने सुनावणी पुढे ढकल्याने निवडणूक होणे अटळ आहे. परिणामी निवडणूक प्रचाराला पुन्हा वेग आला आहे.
आमगाव नगर परिषद आणि सालेकसा नगर पंचायत दोन्ही ठिकाणीची प्रकरण न्यायालयात गेले होते. परंतु दोन्ही ठिकाणी वेगळे कारण होते. आमगाव नगर परिषदेत शहराबाहेरील ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना समाविष्ट करीत नगर परिषद तयार करण्यात आली होती. यावर काही ग्रामपंचायतींनी समाविष्ट करु नये. म्हणून न्यायालयात धाव घेतली. त्यासाठी दोन कारणे न्यायापुढे सादर केली. त्या विपरित सालेकसा नगर पंचायतने आमगाव खुर्द ग्राम पंचायतला समाविष्ट करा ही मागणी करीत सर्व शासकीय कार्यालय आमगाव खुर्दच्या हद्दीत असून आपली मागणी रास्त असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर न्यायालयात धाव घेतली. परंतु त्यांच्या मागणीला फार गंभीरतीने घेण्यात आले नाहीे. आज (दि.२९) सुनावनीची तारीख पुढे ढकलण्यात आली. येत्या १३ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली असल्याचे आमगाव खुर्द येथील याचिकाकर्त्यांनी सांगितले. १३ डिसेंबरलाच नगर पंचायतचे मतदान सुद्धा होणार आहे. त्यामुळे आता निवडणूक अटळ आहे. तर आमगाव खुर्दवासीयांची भ्रमनिराशा झाली आहे. ३० नोव्हेंबर नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतीम तारीख असून १ डिसेंबरपासून प्रचाराला सुरूवात होईल.

Web Title: Salekasa Nagar Panchayat elections are inescapable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.