सालेकसा तालुक्यात भाजपचे पाच तर काँग्रेसचे चार ग्रा.पं.वर वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:28 AM2021-02-13T04:28:23+5:302021-02-13T04:28:23+5:30
सालेकसा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाच ग्रामपंचायतींवर आणि काँग्रेस पक्षाला चार ...
सालेकसा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाच ग्रामपंचायतींवर आणि काँग्रेस पक्षाला चार ग्रामपंचायतींवर आपला सरपंच-उपसरपंच निवडून सत्ता स्थापन करण्यात यश आले. सरपंच-उपसरपंच निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांच्या दावे-प्रतिदाव्यांना विराम लागला आहे. तर, भाजप-काँग्रेस वगळता इतर पक्ष या निवडणुकीत बॅकफूटवर गेलेले दिसून आले. पोवारीटोला ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेच्या खेळीत अखेर काँग्रेसला यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत या निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात गेली.
ज्या नऊ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झालेली होती, त्यामध्ये कावराबांध, कोटजंभुरा, मुंडीपार, कारूटोला आणि पाऊलदौना या पाच ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच-उपसरपंच निवडून आले आहेत. तर कोटरा, सातगाव, मानागड आणि पोवरीटोला या चार ग्रामपंचायतींवर काँग्रेस आपले सरपंच-उपसरपंच निवडून आणण्यात यशस्वी झाले आहे. पोवारीटोला ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची निवडणूक होताना काँग्रेस चार आणि भाजप तीन असे सदस्य निवडून आले होते. परंतु, आपल्याला सरपंचपद मिळावे म्हणून एका महिला सदस्याने भाजपशी हातमिळवणी करून सरपंचपदावर जाण्यासाठी अर्ज केला. शेवटी, काँग्रेसने त्या सदस्यांसमोर आधी नकार दिला होता, परंतु सत्ता जाताना पाहताच त्याच महिला सदस्याला आपले समर्थन दिले व सरपंच-उपसरपंचपद आपल्या गोटात आणण्यात यश मिळविले. परंतु, त्या महिला सदस्याने भाजपचे सदस्यत्व स्वीकारून भाजपकडून अर्ज भरला. त्यामुळे भाजप आता त्यावर आपला दावा करीत आहे.
.....
ग्रामपंचायतनिहाय निवडून आलेले सरपंच-उपसरपंच
ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच पक्ष
कावराबांध-बद्रीप्रसाद दसरिया-चैनसिंह मच्छिरके भाजप
कोटजमुरा - शर्मिला माहुले- जितेंद्र अग्रवाल भाजप
पोवारीटोला -छाया चौधरी- गणेश मेश्राम काँग्रेस
मुंडीपार- चेतनलाल हटोले- योगेश्वरी बसोने भाजप
पाऊलदौना- भरत वट्टी- महेश लिल्हारे, भाजप
सातगाव- नरेश कावरे- अफरोज पठाण काँग्रेस
कारुटोला- उमराव बोहरे- बुधराम जिंदाकूर भाजप
कोटरा- सीमा कोटांगले-नरेंद्र दोनोडे काँग्रेस
मानागड- वनिता सिरसाम-राजेश अडमे काँग्रेस