सलंगटोला शाळा झाली डिजिटल
By Admin | Published: March 5, 2017 12:19 AM2017-03-05T00:19:23+5:302017-03-05T00:19:23+5:30
सालेकसा तालुका अंतर्गत कोटरा केंद्रातील सलंगटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल झाली आहे.
लोकसहभाग : थाटात पार पडला उद्घाटन सोहळा
साखरीटोला : सालेकसा तालुका अंतर्गत कोटरा केंद्रातील सलंगटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल झाली आहे. डीजीटल शाळेचे उद्घाटन जि.प. सदस्य लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश चुटे, प्राचार्य सागर काटेखाये, उपसरपंच नंदकिशोर चुटे, माजी पं.स.सदस्या संगीता शहारे, राजु काळे, चंद्रप्रभा मुनेश्वर, सविता बोहरे, माजी सरपंच मिलींद गजभिये, हनवंत मुनेश्वर, विनोद दोनोडे, सेवकराम दाते, भैयाजी मेंढे, नेतलाल दोनोडे, खुशाल दाते, राजकुमार थेर, शाळा समितीचे अध्यक्ष गजेन्द्र दोनोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता शारदा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चित्रावर पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने करण्यात आले. जि.प. सदस्या दोनोडे यांनी, डिजीटल शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होईल असा विश्वास व्यक्त केला. विज्ञान युगात कॅम्प्युटरचे ज्ञान मुलांना आवश्यक आहे. त्यामुळे डिजीटल शाळेचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे असे मत व्यक्त केले.
डिजीटल शाळा बनविण्यासाठी ग्रा.पं.कडून २३ हजार रुपये देण्यात आले व बाकी रक्कम गाव वर्गणीतून गोळा करण्यात आली. प्रास्ताविक मांडून संचालन मुख्याध्यापिका एल.जी. शहारे यांनी केले. आभार सहायक शिक्षक टी.के. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय फुंडे, श्रीकिसन हुकरे, सेवकराम ब्राम्हणकर, निशा शिवणकर, प्रतिभा दाते, ललीता चुटे, रेखा चुटे, योगीता मुनेश्वर, शाळा समितीचे सर्व सदस्य, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघाने सहकार्य केले. (वार्ताहर)