जिल्ह्यात छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना

By admin | Published: February 21, 2016 01:03 AM2016-02-21T01:03:04+5:302016-02-21T01:03:04+5:30

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Salute to Chhatrapati Shivaji Maharaj in the district | जिल्ह्यात छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना

जिल्ह्यात छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना

Next

गोंदिया : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा-महाविद्यालय व विविध संस्थांसह येथील छत्रपती मराठा समाजाच्यावतीने जाणत्या राजाला मानवंदना अर्पण करण्यात आली. शिवरायांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांसह मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते.
ग्राम फुलचूर
गोंदिया : जवळील ग्राम फुलचूर येथे आयोजीत शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खरेदी-विक्री संघाचे संचालन सुभान रहांगडाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती स्नेहा गौतम, सेवकराम बंसोड, डॉ. गुणीलाल रहांगडाले, अशोक आंबेडारे, संतोष चौधरी उपस्थित होते. छत्रपती शिवाजींच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी पाहु्ण्यांनी शिवजींच्या जिवनावर प्रकाश टाकला. संचालन राजेश अंबुले यांनी केले. आभार सुकचंद येळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अनिल रहांगडाले, युवराज तुरकर, विनायक मेश्राम, बाणा नेवारे, विजय कोल्हे, गोकूल शहारे, आशिष थापा, किशोर रहांगडाले, जामवंत अंबुले, संतोष गाते दिनेश पटले आदिंनी सहकार्य केले. विशेष म्हणजे याप्रसंगी अग्रवाल यांनी चामलाटे या गरजू परिवाराला भेट देऊन त्यांना तीन हजार रूपयांची आर्थिक मदत दिली.
कर्मचारी-अधिकारी कल्याण संघ
गोंदिया : संघटनेच्या भवनात एच.आर. लाडे यांच्या अध्यक्षतेत शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनोज राऊत उपस्थित होते. याप्रसंगी लाडे यांनी सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणाऱ्या शिवाजी महाराजांचे गुण अंगिकार करण्याचे आवाहन केले. संचालन सरचिटणीस पवन वासनीक यांनी केले. आभार कल्पना जांभूळकर यांनी मानले. कार्यक्रमाला एम.के.मडामे, यु.आर. मडावी, एस.आर.मेश्राम, गणेश गणवीर, राजू मेश्राम, सी.टी. उंदीरवाडे, अ‍ॅड. संजीव रंगारी, माधुरी टेंभुर्णीकर, अनिरूद्ध मडामे, न.बी. सोनवाने, एच.जी. टेंभेकर, गुरूदास गिरीपुंजे, जितेंद्र खोब्रागडे उपस्थित होते.
श्री शिवछत्रपती मराठा समाज
गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व श्री शिव छत्रपती मराठा समाजाच्या संयुक्तवतीने मनोहर चौकातील नियोजित स्थळी छत्रपतींची ३८८ वी जयंती मराठा समाजाच्या महिला अध्यक्ष द्वारकाताई सावंत यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली. तर माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे अघ्यक्ष अशोक इंगळे, सामाजिक कार्यकर्ता उदय प्रमर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णकांत शेंडे, माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, समाजाचे सचिव दीपक कदम, नगर परिषद मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजू सोनावने, शहर पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, स्थानिक गुन्हे शाखेचे जैराज रन्नवरे, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश रहांगडाले, झाडीबोली साहीत्य कला मंचचे कलाकार जीवन लंजे, पुष्पक जसानी, भरत क्षत्रीय, सीमा डोये, नगरसेविका भावना कदम, सुनिता तरोणे व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी सुराज्य व स्वराज्याचे संस्थापक म्हणून इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी आठवण करणार असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान समाजातील चिमुकल्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. आभार दीपक कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी समाजबांधवांनी सहकार्य केले.
राजस्थान कन्या विद्यालय
गोंदिया : शाळेत आयोजीत शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका साहू यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या छायाचित्रासमोर दिप प्रज्वलीत करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षिका राजपूत प्रामुख्याने उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन, कर्म, संघर्ष व विजयाशी संबंधित माहिती भाषण व गितांच्या माध्यमातून सादर केली. मुख्याध्यापिका साहू यांनी, शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत घटनांवर प्रकाश टाकत त्यांचे गुण अंगीकार करण्याचे मत व्यक्त केले. संचालन करून आभार खंडेलवाल यांनी मानले.
पंचशील हायस्कूल, मक्काटोला
सालेकसा : प्राचार्य व्ही.डी. मेश्राम यांच्या अध्यक्षतेत आयोजीत जयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एम.एफ. कुलसुंगे, पी.एम. कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करुन माल्यार्पण करण्यात आले व पुष्पांजली वाहण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य मेश्राम यांनी, शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभावचे पालन करणारे होते. त्यांनी रयतेचा राजा म्हणून संघर्षातून वाट काढत स्वराज्याची स्थापना केल्याचे सांगीतले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा शिवाजी महाराजाबद्दल आपले मत प्रकट केले व त्यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. संचालन करुन आभार वाय.एन. पाठक यांनी मानले.
गोंदिया पब्लिक स्कूल
गोंदिया : पराक्रमी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेचे व्यवस्थापक प्रफुल वस्तानी व प्राचार्य रिता अग्रवाल यांनी प्रतिमेचे पूजन करुन विद्यार्थ्यांना शिवारायांबद्दल माहिती दिली. तद्नंतर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इयत्ता ५ वीचा विद्यार्थी ओम लांजेवार याने गीत सादर केले. तर अन्य विद्यार्थ्यांनीही शिवरायांवर भाषण सादर केले. शाळेच्या शिक्षिका वंदना हेमने यांनी शिवरायांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला. शाळाध्यक्ष प्रा. अर्जुन बुद्धे, सचिव डॉ. इंदिरा सपाटे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करीत महाराष्ट्रातील या विरांची जयंती साजरी करण्याचा अभिमान आम्हाला आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
पंचशील विद्यालय
बाराभाटी : स्थानिक पंचशील विद्यालयात शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एच.जी. मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोरेश्वर सौंदरकर, ए.डी. घानोडे, आर.डी. कोल्हारे, आर.एस. गलगले, एम.एम. मेश्राम, ए.पी. दिघोरे, सचिन सोनटक्के उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थिनी सिमरन रामटेके हिने भाषण सादर करून शिवरायांच्या जिवनावर प्रकाश टाकला. तर उपस्थित पाहुण्यांनीही शिवरायांवर आपले विचार व्यक्त केले. संचालन कोल्हारे यांनी केले. आभार घोनोडे यांनी मानले.
बजरंग दल
सिलेझरी : बजरंगल दल व बजरंग मंडळाच्यावतीने शिवाजी महाराजांंची जयंती रॅली काढून साजरी करण्यात आली. हनुमान देवस्थानासमोर रॅलीची सांगता करण्यात आली आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी ब्राह्मणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून हभप. हरी इंजोरीकर, प्रकाश टेंभुर्णे, विवेक खंडाईत, सुखदेव मेंढे, जगदीश टेंभुर्णे, सुनीता ब्राह्मणकर, पुरुषोत्तम नंदेश्वर, पिसाराम गणवीर, लक्ष्मण मेंढे, सुरेश कोरे, देवनाथ नंदेश्वर आणि बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन दुर्वेश ब्राम्हणकर यांनी केले. आभार दिलेश ब्राम्हणकर यांनी मानले.
ज्ञान विकास वाचनालय
इटखेडा : वाचनालयात आयोजीत छत्रपतींच्या जयंती कार्यक्रमाला मोरेश्वर भावे, संस्था सचिव पुंडलीक धोटे, नितीन धोटे, राकेश कोल्हे, श्रद्धा धोटे, अर्चना नखाते प्रामुख्याने उपस्थित होते.
छत्रपतींच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी भावे यांनी, शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत वाचक सभासद उपस्थित होते. तर यासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही शिवाजी महाराजांची जयंती विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
जि.प.प्राथमिक शाळा
अर्जुनी मोरगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजीत जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र रहेले होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.के. मुंगमोडे, डी.एस. कापगते, एस.जी. ईखार उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गाणे, भाषण सादर करून शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकला. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)

Web Title: Salute to Chhatrapati Shivaji Maharaj in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.